सरकारच्या एलआयसी संदर्भातील निर्णयाचा,काळ्या फीती लावून निषेध..
दिनांक ५ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी भारतीय जीवन विमा निगम एलआयसीतील (LIC)चा काही हिस्सा सरकार विकणार असल्याचे जाहीर केले आहे. एलआयसीसारखी अत्यंत सशक्त आणि भारताची महारत्न असणारी कंपनी विकायला काढणे ही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब आहे.वास्तविक,एलआयसीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नेहमीच मजबुती मिळत गेली आहे. असे जाणकारांचे मत असताना भारत सरकारने मात्र, हा निर्णय घेतला आहे.सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ श्रीगोंद्यातील एलआयसी कर्मचाऱ्यांनी एक तास आंदोलन करत,या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
ऑल इंडिया एस्सी,एसटी आणि बुद्धिष्ट एलआयसी एम्पलॉइज वेल्फेअर असोसिएशनने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी दुपारी एक तास काम बंद ठेवून.भारत सरकारच्या एलआयसी संदर्भातील निर्णयाचा काळ्या फीती लावून निषेध नोंदवला.
या आंदोलनात गोपीचंद वायदंडे,सुभाष शिंदे,विजय नागपुरे,राजू लांडगे,सागर लखापुरे,संदीप शिरसागर, जगन्नाथ गायकवाड,अनिल काळे आणि निशांत मोरे हे सहभागी झाले होते.यावेळी एलआयसी को बचाने हम उतरे मैदान मे,बघता काय सामील व्हा,स्टॉप प्रायवेटिंग एलआयसी,खाजगीकरण हाय हाय,एस्सी- एसटी वेल्फेअर असोसिएशन जिंदाबाद ! अशा आंदोलकांनी घोषणा दिल्या.याविषयीचे निवेदन संघटने मार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.