शेतात काम करणाऱ्या महिलेवर पत्नीच्या मदतीने अत्याचार..

दिनांक ५ फेब्रुवारी(लोणी व्यंकनाथ,श्रीगोंदा):
लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा येथील एका व्यक्तीने शेतात काम करण्यास आलेल्या महिलेला,पत्नीच्या मदतीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.दोन मुली असल्याने मुलासाठी पती-पत्नीला वारंवार दुसऱ्या लग्नाची भीती दाखवत होता.यातून बचाव करण्यासाठी,पत्नीने शेतात कामावर येणाऱ्या एका महिलेला पतीबरोबर मैत्री करण्याचा सल्ला दिला आणि दोघांच्या संगनमताने ती महिला या पतीच्या हौसेची शिकार झाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक या गावातील २७ वर्षीय महिला आपल्या पती सोबत सासरी नांदत असताना,उपजीविकेसाठी गावातील महिलांबरोबर सुमारे पाच वर्षांपूर्वी लोणी व्यंकनाथ येथील शेतकरी बाबा छत्रे याच्या शेतात काम करण्यासाठी गेल्या असता, बाबा छत्रे याने पत्नीच्या संगनमताने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनला या पिडितेने दिलेल्या फिर्यादीनंतर नमूद प्रकरण उघड झाले आहे.
बाबा छत्रे याला दोन मुली असल्याने मुलासाठी तो सतत त्याच्या पत्नीला दुसरे लग्न करण्याची धमकी देत असे.यातून त्याची पत्नी मानसिक तणावात होती. याबाबत बाबाच्या पत्नीने या पीडित महिलेला हकीगत सांगत नवऱ्याशी मैत्री करण्याचा सल्ला दिला. त्याच्या सोबत बोलत जा.फोन करत जा. असेही सांगितले. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे,सन २०१८ मध्ये(तारीख सांगता येत नाही)पारगाव सुद्रिक येथील महिलांसोबत पीडित बाबाच्या शेतात कामानिमित्त गेली. सोबत आलेल्या महिलांना बाबाच्या पत्नीने जाणीव पूर्वक दुसऱ्या शेतात कामासाठी नेले. शेतात फुटलेल्या पाईपचे काम करण्यासाठी पती बरोबर तिला पाठवले. एकटी पाहून पतीने पीडिते सोबत अश्लील चाळे केले.पीडितेने विरोध केला.मला एक लहान मुलगी असल्याचे सांगितले. तरी बाबाने तिचे काही ऐकून न घेता जबरदस्तीने शरीरसंभोग केला.बदनामी होईल म्हणून हे प्रकरण कोणाला न सांगता.नमूद महिलेने कामावर जाणे सोडून दिले.कामावर येत नसल्याने त्या महिलेला बाबाने वारंवार फोन केले व झालेला सर्व प्रकार घरच्यांना सांगत तुझी बदनामी करून संसाराचे वाटोळे करेल अशी धमकी दिली.
भीतीपोटी एक महिन्यानंतर पुन्हा ही महिला छत्रेच्या रानात कामाला गेली.तेव्हा बाबाने पुन्हा तिच्याबरोबर जबरदस्ती करीत अत्याचार केला.यानंतर एक वर्ष होऊन गेले.ही महिला नमूद बाबाच्या शेतात कामानिमित्त गेली नाही.मात्र,दिनांक २ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी साडेचार वाजता बाबा छत्रे थेट तिच्या घरी पारगाव सुद्रिक येथे पोहोचला.त्याने या महिलेला मला फोन करत जा,तू मला आवडतेस, तुझ्या नवऱ्याने तुला सांभाळले नाही,तर मी तुला सांभाळेन.नाहीतर तुझ्या दोन्ही मुलींना मारून टाकीन व नवऱ्याला किडण्याप करील.अशी धमकी दिल्याने पीडित महिलेने बाबासाहेब छत्रे व त्याच्या पत्नीच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून बाबा छत्रे व त्याची पत्नी यांच्या वर भादवि कलम ३७६ व १०९ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Leave a Reply