धक्कादायक! वर्ध्यात भरचौकात महिलेला पेटविले..

व्हायरल न्यूज:
दिनांक ४ फेब्रुवारी,वर्धा:
जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका महिलेवर चक्क पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला आहे. ही महिला व्यवसायाने शिक्षिका असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दैनंदिन कामकाजाकरीता ही महिला सोमवारी सकाळी घराबाहेर पडली होती. या महिलेच्या मागावर असलेला एक तिशीतला युवक तिच्या घराबाहेरच दबा धरून बसला होता. ही महिला शहरातील नंदेरी चौकात आली असता,या युवकाने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळले.ही धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात घडली. या महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आरोपीने हे कृत्य केल्यानंतर तो तिथून तत्काळ पळून गेला. त्यावेळी चौकात उभे असलेल्या काही युवकांनी त्याचा पाठलाग केला. मात्र तेथून पसार होण्यास तो यशस्वी झाला.
पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे हिंगणघाटमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भरचौकात घडलेल्या या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी तातडीने या महिलेला रुग्णालयात दाखल केले.या महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
(वृत्तसंस्था)

Leave a Reply