कुटुंबातील कर्त्या व्यक्तीवर ओढवलेल्या संकटामुळे,परिवार निराधार..मदतीचे केले आवाहन..
दिनांक ४ जानेवारी श्रीगोंदा :
श्रीगोंदा शहरातील रोकडोबा चौक परिसरात वास्तव्यास असणारे शांताराम झुंबर रोही हे आपली मुलगी श्रुती,पत्नी सुषमा,आई सुमन हे कुटुंब सांभाळण्यासाठी श्रीगोंदा शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये मजूरी करीत होते.त्यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा सांभाळ केला.पण,आज त्यांना मोठा आजार उद्भवला आहे.
याविषयी त्यांच्या नातेवाइकांनी माध्यमांना माहिती दिली की,शांताराम रोही यांना पुणे येथील दीनानाथ मंगेशकर या दवाखान्यात दाखल केले असून, डॉक्टरांनी तपासणी नंतर रोही गंभीर आजाराने पीडित असल्याने तात्काळ त्यांचे लिव्हर बदलावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.यासाठी मोठा खर्च लागणार असल्याने,या साधरण कुटुंबातील कर्त्या व्यक्तीवर ओढवलेल्या संकटामुळे हा परिवार निराधार झाला आहे.ही मोठी रक्कम जमविणे परस्थिती नुसार यानां कठीण जात आहे.म्हणून नातेवाईक व समाजातील दानसुर व्यक्तींना,पीडित कुटुंबातील मुलगी,पत्नी व आई यांनी मदतीचे अवाहन केले आहे.
या आजारातून शांताराम यांना वाचवण्यासाठी त्याचे लिव्हर बदलावे लागणार असून,त्यासाठी २५ ते ३० लाख रुपये खर्च दवाखाना व्यवस्थापनाने सांगितला आहे.आतापर्यंत जवळच्या संबंधितांनी पन्नास ते साठ हजार रक्कम रोही यांच्या कुटुंबाला मदत मिळवुन दिली आहे.समाजासह संबंधित नातेवाईकांनी व मित्रांनी सढळ हाताने माझ्या मुलाच्या उपचारासाठी मदत करावी.असे आवाहन शांतारामच्या आईने केले आहे.
शक्य असल्यास:
आर्थिक मदतीसाठी:
मोबाईल क्रमांक: 9420344099,9420445357,8857007527
यावर संपर्क करावा.
किंवा acccount number : 30363826316 ,
IFSC CODE :SBIN0000295
या बँक खात्यात मदत निधी म्हणून जमा करावा.अशी विनंती केली आहे.