दौंड नंतर श्रीगोंद्यात नवीन रेल्वे जंक्शन होणार..

श्रीगोंदा – जामखेड – मांजरसुबा – केज – घाटनांदूर नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरु : आ.पाचपुते

दिनांक ७ फेब्रुवारी,श्रीगोंदा :
पंधरा वर्षापूर्वी नगर – परळी हा रेल्वे मार्ग मंजूर झाला. परंतु,तो आष्टीमार्गे बीडकडे वळविल्याने जामखेड करांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आता श्रीगोंदा – जामखेड – मांजरसुबा – केज – आंबेजोगाई – घाटनांदूर या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ३४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. अशी माहिती माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी दिली.
आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर पासून रेल्वे सर्वेक्षणाचे स्टोन मार्किंग करण्याचे काम सुरु झाले आहे.या रेल्वे मार्गामुळे श्रीगोंदा – जामखेडच्या विकासात भर पडणार आहे.दौंड जंक्शन नंतर श्रीगोंदे तालुक्यात नवीन जंक्शन बनविण्यात येणार आहे. असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विन लौहानी यांनी सांगितले.
सर्वेक्षणाची टीम आज श्रीगोंदा येथे येऊन आ. पाचपुते यांना भेटून गेली.या नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणास मान्यता दिल्याबद्दल विशेष करून देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्रजी मोदी,केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल,केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी,माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू,माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,नगर दक्षिणचे खा.डॉ. सुजय विखे पाटील मा.खा.दिलीप गांधी या सर्वांचे आ.पाचपुते यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले.
चाकण- आंबेजोगाई राष्टीय महामार्ग
चाकण – शिक्रापूर – नाव्हरा – मांडवगण – काष्टी – श्रीगोंदा – जामखेड – आंबेजोगाई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी.चा पहिला टप्पा सुरु झाला असून, त्यासाठी २५६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.रेल्वे मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारने हाती घेल्यामुळे या भागाचा कायापालट होईल असेही,आ. पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading