दोन सराईत गुन्हेगारांना पिंपळनेर व श्रीगोंदा येथून अटक केली.
व्हायरल न्यूज:
दिनांक १२ फेब्रुवारी,लोणीकंद:
येथे एका पादचाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील ऐवज लुटून फरार झालेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पिंपळनेर व श्रीगोंदा येथून अटक केली. लोणीकंद पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
तुषार रखमाजी पवार (वय १९ रा. पिंपळनेर ता. पारनेर जि. अहमदनगर),राजू विजय तुपे (वय २२ रा.औटीवाडी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.या प्रकरणी पंकज कुमार त्रिभुवन प्रजापती (वय २४) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज कुमार हे ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील महाराष्ट्र बँकेसमोरून लोणीकंद माथा येथे पायी चालत जात असताना,मोटर सायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी पंकज कुमार यांना थांबवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील १२००० रुपये रोख रक्कम व रेडमी कंपनीचा मोबाइल हँडसेट व एक जिओ कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून मोटार सायकलवरून पळ काढला.