#corona चीनने १४ हजार रुग्णांचे मृतदेह जाळले? उपग्रहाच्या छायाचित्रामुळे संशय.

व्हायरल न्यूज:
चीनमध्ये हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस आता अधिक रौद्र रूप धारण करताना दिसत आहे. आजघडीला जगभरातील तब्बल ४३०९८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा १०१८ वर गेला आहे. एकूण रुग्णांपैकी ४०१७१ रुग्ण हे चीनचेच नागरिक आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर फैलावणाऱ्या कोरोनापुढे चीन प्रशासन हतबल झालं आहे.
या कोरोनासंबंधी आणखी एक धक्कादायक माहिती मिळत आहे.
चीनमध्ये १४ हजार कोरोनाग्रस्तांना चीन प्रशासनाने जाळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चीन सरकार मरणाऱ्यांची संख्या कमी दिसावी यासाठी हे करत असल्याचं बोललं जात आहे. कारण, अवकाशातील उपग्रहांनी कोरोनाचे मूळ ठिकाण असलेल्या वुहान प्रांताची काही छायाचित्रं घेतली आहेत. त्या छायाचित्रात लाल पिवळ्या रंगाचा आगीच्या लोळासारखा प्रकाश दिसत असून हा प्रकाश सल्फर डायऑक्साईडचा आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांच्या संशयाची सुई चीनवर रोखली गेली आहे.
त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, चीनमध्ये मृतदेहांना जाळण्याची परंपरा नाही. अवकाशातून घेतलेल्या छायाचित्रात आगीसारखा लाल-पिवळा लोळ दिसत आहे. हा लोळ सल्फर डायऑक्साईडचा असून तो तेव्हाच उत्पन्न होतो, जेव्हा एखादा वैद्यकीय कचरा किंवा खूप मोठ्या संख्येने मृतदेह जाळले जातात.
वुहान येथील सल्फर डायऑक्साईचं प्रमाण १७०० यूजी प्रति क्युबिक मीटर इतकं आहे. सामान्यतः ८० यूजी प्रति क्यु.मीटर इतका सल्फर डायऑक्साईडही घातक मानला जातो. वुहानमध्ये हेच प्रमाण २१ पटींनी जास्त आहे. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे जवळपास १४ हजार मृतदेह जाळले गेले असावेत. तेव्हाच इतका सल्फर गॅस निर्माण झाला आहे. याच कारणाने चीन प्रशासनावर संशय व्यक्त केला जात आहे.
चीनमध्ये या विषाणूने थैमान घातलं असून आगामी काळात वुहान प्रांतातील ५ लाख नागरिकांना याचं संक्रमण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading