श्रीगोंद्यात खेळाडुंचा सन्मान..

(पोलिस स्टेशन व अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम)

दिनांक १५ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
“पोलिस रेझींग डे सप्ताह” निमित्ताने श्रीगोंदा पोलिस स्टेशन व अग्नीपंख फौंडेशनने आयोजीत केलेल्या मॅरेथाॅन व क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंना आज बक्षीसं देत त्यांचा सन्मान करण्यात आला.त्याच बरोबर (सहाय्यक पोलीस निरीक्षक)सतिश गावीत, राजेंद्र सानप यांचा विशेष कामगिरी बद्दल यावेळी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पोलिस उपअधीक्षक संजय सातव हे होते.
कार्यक्रमात विचारमंचावर(जेष्ठ नेते)राजेंद्र नागवडे,(पोलीस उप विभागीय अधिकारी)संजय सातव, प्रा.तुकाराम दरेकर,बेलवंडी पोलीस ठाण्याचे,(पोलीस निरीक्षक)अरविंद माने,श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे (पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव,श्रीगोंदा नगर पालिकेचे(उप नगराध्यक्ष)अशोक खेंडके हे होते.
(नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष)राजेंद्र नागवडे (पोलिस निरीक्षक)दौलतराव जाधव व (पोलीस निरीक्षक)अरविंद माने,विठ्ठल पाटील प्रा.तुकाराम दरेकर यांचे हस्ते प्रविण गाढवे,करण कदम,संकेत कांबळे,भाग्यश्री फंड,धनश्री फंड,श्रेया मांडवे,पूनम शेटे,संदीप रोडे,संदीप खाडे,अरविंद कापसे,मच्छिंद्र लोखंडे,शशीकांत मांगडे,संतोष काळोखे यांचा बक्षीसे देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राजेंद्र नागवडे म्हणाले की,पोलिस स्टेशन व अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंद्यात मॅरेथॉन व क्रिकेट स्पर्धेचा चांगला उपक्रम राबविला आहे.कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात श्रीगोंदा पोलीस स्टेशनचा संपूर्ण जिल्ह्यात दबदबा आहे.हजारोंच्या संख्येने गुन्हेगारांना अटक करीत,तालुक्यात कायद्याचा धाक निर्माण केल्याने,श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोनि दौलतराव जाधव यांचा राज्य शासनाच्या वतीने सन्मानही करण्यात आला आहे.पुढील कार्यास शुभेच्छा देत,नागवडेंनी त्यांच्या भाषणाची सांगता केली.
(पोलिस उपअधीक्षक)संजय सातव म्हणाले की, राज्यातील गुन्हेगारी प्रमाणात नंदुरबार नंतर श्रीगोंदा तालुक्याचे नाव समोर येत असतांना पोनि जाधव यांनी साधारण २ हजारांच्या आसपास विविध गुन्ह्यांतील आरोपींना अटक करून,पोलीस प्रशासनाचा चांगला धाक निर्माण केला आहे.श्रीगोंदेकरांनी पोलिस रेझींग डे निमित्ताने आयोजीत केलेल्या स्पर्धांना चांगला प्रतिसाद दिला असल्याचेही सातव साहेबांनी यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमात माजी जिप सदस्य अनिल ठवाळ, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतिष शेठ पोखरणा,संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर,पुण्यनगरी चे पत्रकार विशाल चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पोनि दौलतराव जाधव यांनी प्रास्ताविक केले.
उपनगराध्यक्ष अशोक खेंडके,अँँड.सुनील भोस, शहाजी खेतमाळीस,सतिश पोखर्णा,अँँड.अशोक रोडे,संतोष खेतमाळीस,राजेंद्र उकांडे,नाना शिंदे,दिलीप लबडे,इंजी.श्याम जरे,गोरख आळेकर, शुभांगी लगड,डॉ.स्मिता तरटे,पोकॉ.अविनाश ढेरे,संतोष कोपनर,पोलीस स्टेशनचे अधिकारी गावित,पाटील, सानप, पोकॉ अमोल आजबे,अंकुश ढवळे,भारती इंगवले,कुस्ती प्रशिक्षक किरण मोरे सह पोलीस कर्मचारी,पत्रकार बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातील छायाचित्रे…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading