अवैध धंद्यावर कारवाई करा,आमच्या मुली-बाळींच्या जीवास व चरित्र्यास धोका होऊ शकतो ! तक्रारी अर्ज देऊन पंधरा दिवस उलटले तरी,कारवाई नाही.थंडीने गारठली काय श्रीगोंद्याची पोलीस यंत्रणा ?

श्रीगोंदा दिनांक २ डिसेंबर :- 

                 श्रीगोंदा शहरांतून व तालुक्यातुन अवैध धंदे बंद करण्यात यशस्वी ठरलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या बदली प्रक्रियेदरम्यान नोव्हेंबर महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यात श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीतील सिद्धार्थ नगर परिसरात खुले आम सूरु असलेले गावठी दारू विक्रीचे धंदे व ताडी विक्री तात्काळ बंद करा,अन्यथा या धंद्यांवर कारवाई साठी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे, निवेदन श्रीगोंदा पोलिसांना सादर करणार असल्याची माहिती सिद्धार्थनगर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेने दिली आहे.शिवाय गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या धंद्यावाल्यांपासून माझ्या कुटुंबास व माझ्या कुटुंबातील तरण्या पोरींच्या जीवितास व चारित्र्यास धोका निर्माण होण्याची श्यक्यता तिने या निवेदनात नमुद केली आहे.

                 मात्र नुकत्याच पडलेल्या थंडीने श्रीगोंदा पोलीस ठाण्याची यंत्रणा गारठली की काय असा प्रश्न या निवेदनाच्या निमित्ताने समोर येत आहे.अवैध धंद्यावर कारवाई करा,चालू असलेल्या धंद्याचे पत्ते ,ठिकाण नमूद करून कारवाई का होत नाही ?श्रीगोंदा टाऊन चे दहिफळे दादा,गोपनियचे कोपनर दादा व ढेरे दादा यांना सदरील माहीत दिली असून,कारवाई होत नाही. सदर अवैध धंदे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आसपासच्या परिसरात चालू आहेत.ज्या ठिकाणी स्वतः भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आले होते,या घटनेचे औचित्य साधत त्या पवित्र ठिकाणी स्मारक बांधण्यात आले आहे.मात्र हे परम पवित्र ठिकाणच अवैध धंद्याच्या विळख्यात सापडले असल्याचे निदर्शनास येते आहे.

             सदर तक्रारदार महिला ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे.तिच्या घरच्या आजूबाजूस ही सर्व अवैध गावठी दारू व ताडी विक्री करणारी यंत्रणा आहे.दारू मागण्यांसाठी येणारे गिऱ्हाईक अनेक वेळा या महिलेच्या घरात दारू मागण्यांसाठी घुसले असून ,तिच्या तरण्या मुली आहेत ,ही महिला झाडू पोछा असे मजुरीच्या कामानिमित्ताने दिवसभर घरातून बाहेर असते.दरम्यान कोपर्डी सारख्या अनुचित प्रकारच्या भितेने या महिलेने श्रीगोंदा पोलिसांना तिची व्यथा लेखी अर्जाच्या स्वरूपात मांडली असून, श्रीगोंदा पोलीस मात्र या कारवाई कडे दुर्लक्ष करीत आहे.पोलिसांच्या या दूर्लक्ष करण्यामागे या धंदेवाल्यांकडून पोलिसांना मिळत असलेले हप्ते किंवा या गावठी दारू धंदेवाल्यांची दहशत किंवा नुकत्याच पडलेल्या थंडीने पोलीस पारच गारठून गेलेत की काय? नेमके कारणं मात्र समजू शकले नाही.सदर महिला तक्रारी अर्ज देऊन कारवाईची प्रतीक्षा करीत आहे.बघू नवीन आलेले पोलीस निरीक्षक या अवैध धंद्यावर कारवाई करतात की नाही ?

Leave a Reply