आधुनिक भारताच्या जडणघडणीत फुले आंबेडकरांचे अतुलनीय योगदान :- प्राचार्य विक्रम कांबळे…​

घारगाव,श्रीगोंदा ,दिनांक ७ डिसेंबर:-
             आधुनिक भारताच्या जडणघडणीतफुले आंबेडकरांचे अतुलनीय योगदान असून जगातील ६  कर्ते विचारवंतात डॉ बाबासाहेब आंबेडकर नंबर १ आहेत असे प्रतीपादन प्राचार्य विक्रम कांबळे यांनी केले ..साईकृपा कला महाविद्यालय घारगाव व फॅशन डिझायनिंग इंस्टीट्यूट घारगाव ता श्रीगोंदा.. यांच्या वतीने आयोजित केलेल्या परीसंवादात  अध्यक्षीय पदावरून बोलत होते..
               या कार्यक्रमाचे उद्घााटन दत्तकृपा शैक्षणिक संकूलाचे उपाध्यक्ष मा बाळासाहेब साळुंके व शैक्षणिक संकूलाचे शिक्षण विस्तार संचालक मा कल्याण शिंदे यांनी केले.. यावेळी  झालेल्या परीसंवादात प्रमुख वक्ते …शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश राठोड व डॉ. मच्छिंद्रनाथ गोंटे  यांनी फुले आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन विध्यार्थी व प्राध्यापकाना मंत्रमुक्ध केले … यावेळी विचारमंचावर.. प्रा .. ढगे.विभागप्रमुख.. फॅशन.. प्रा गायकवाड मॅडम उपस्थित होत्या… प्रा प्रदीप पंडित यांनी अतिशय प्रेरणादाई असे सूत्रसंचालन केले . आभार गायकवाड मॅडम यांनी मांडले..

Leave a Reply