“मी श्रीगोंदेकर” इन्स्टाग्राम पेजवर बदनामी प्रकरणी एकाविरुद्ध सायबर सेलला तक्रार दाखल.

दिनांक २४ ऑक्टोबर २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीने सायबर पोलीस स्टेशनला हजर राहून ‘मी श्रीगोंदेकर’ या नावाने असलेल्या इन्स्टाग्राम पेजवर बदनामीकारक पोस्ट्स टाकल्याप्रकरणी विनोद भिमराव सुर्यवंशी याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सायबर पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता की, राजेंद्र नागवडे यांच्या बदनामीच्या उद्देशाने त्यांच्या फोटोंचा वापर करून ‘मी श्रीगोंदेकर’ या इन्स्टाग्राम पेजवर बदनामीकारक पोस्ट्स टाकल्या जात आहेत. या अकाऊंटवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

सायबर सेलला समक्ष हजर राहून अर्ज चौकशी संदर्भात माहिती घेतली असता, ‘मी श्रीगोंदेकर’ हे इन्स्टाग्राम अकाऊंट उघडण्यासाठी मो.नं. ७८७५२..९०२ आणि ९२२..५८८९१ या नंबरचा ओटीपीसाठी वापर करण्यात आल्याचे उघड झाले

मोबाईल नंबर ७८७५२..९०२ हा बापुराव भिमराव सुर्यवंशी यांच्या नावावर असून तो त्यांचा भाऊ विनोद भिमराव सुर्यवंशी (रा. नवनागापूर, एमआयडीसी, अहिल्यानगर, मूळ रा. देऊळगाव गलांडे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) वापरत असल्याची माहिती मिळाली.

Limited-time deal: Portronics 65W Halley 20K 20000mAh Fast Charging Powerbank for Android Smartphones, iPhones, ipads, Tablets & Macbooks, Dual Type C PD Port, LED Display, Strong Lanyard (Black) https://amzn.in/d/jdMvH7w

या ‘मी श्रीगोंदेकर‘ इन्स्टाग्राम पेजवर राजेंद्र शिवाजीराव नागवडे यांच्या नावाने आक्षेपार्ह पोस्ट्स टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये “श्रीगोंदा मतदारसंघात पूर परिस्थिती झाली पण लाडका राजूदादा कोणत्या बिळात लपून बसलाय कोणास ठाऊक”, “राजू दादा मतदारसंघात फिरतात Google Map लावून आणि परदेशात जातात गॉगल लावून”,

“मायला RCB सुद्धा IPL ट्रॉफी जिंकली, मी केव्हा आमदार होणार”, “तमाशा बंद करायला आलेला मास्तरंच, जेव्हा तुन तुन हातात घेतो”, तसेच “पाचपुतेंना संपवायला आलेले आता महायुतीत आले. एवढंच नाही तर अजितदादा उपस्थित नसतांनाही त्यांच्या पक्षात प्रवेश केला” अशा पोस्ट्स टाकून राजेंद्र नागवडे यांची बदनामी केली गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या सर्व प्रकारामुळे फिर्यादीनी विनोद भिमराव सुर्यवंशी यांच्याविरूद्ध सायबर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

स्रोत:(तक्रार)

आत्ताचा खरेदी करा.. Amazon वरून माफक किंमतीत..! Galaxy m 16 5G

https://amzn.to/4qyyA4X

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading