श्रीगोंदा पोलिसांकडून १ लाख ५ हजार रुपयांचे गहाळ मोबाईल परत; मूळ मालकांना दिलासा..

दिनांक २७ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस स्टेशनने (Shrigonda Police Station) कामगिरी करत तालुक्यातील सात नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून काढले आणि ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले. या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे १,०५,०००/- रुपये इतकी आहे.

श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेले हे मोबाईल खालील नागरिकांना मिळवून दिले.


१. राहुल शिवाजी करंडे (रा. रेल्वेस्टेशन, श्रीगोंदा)
२. बाळासाहेब दगडू घोडके (रा. मांडवगण, श्रीगोंदा)
३. शरद शिवराम वागस्कर (रा. सुरोडी, श्रीगोंदा)
४. कार्तिक पांडुरंग नागवडे (रा. वांगदरी, श्रीगोंदा)५. दिनेश गौतम (रा. लोणी व्यंकनाथ, श्रीगोंदा)
६. सिताराम तुकाराम भुजबळ (रा. माळवाडी, अजनुज, श्रीगोंदा)
७. गणेश बापुराव पवार (रा. काष्टी, श्रीगोंदा)
या सर्व नागरिकांचे मोबाईल शोधून पोलिसांनी त्यांना दिलासा दिला आहे.

https://amzn.to/4olDTTu

सदरची यशस्वी कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. वैभव कलबुर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. प्रविण लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग, कर्जत यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या आदेशाने पोकॉ. सचिन गोरे यांनी मोबाईलचा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या (Shrigonda Police Station) या तत्परतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading