दिनांक ६ मे २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील एका छोट्या गावात वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबातील विवाहितेने घर सोडून पलायन केलेले प्रकरण नुकतेच समोरं आले असुन, तिला देहविक्रिसाठी अज्ञात व्यक्तींनी तयार केले असल्याचे पिडीत कुटुंबातील लोकांचा अंदाज आहे. यासाठी श्रीगोंदा शहरात राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींनी तिला जाळ्यात ओढले असल्याचेही नातेवाईकांचे म्हणणे आहे. तर, त्या विवाहित महिलेला या सर्व प्रक्रियेतून सोडण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत. तरीही, नमुद महीला त्यांचे एक न ऐकता श्रीगोंदा पोलीस ठाण्यातून पोलिसांसमोरून पळून गेल्याचा आरोप त्या महिलेच्या पती व नातेवाईकांनी केला आहे. तर, हे सर्व नाटकं करण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला घेऊन, आलेल्या आक्काकडून पैसे उकळल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील एका छोट्या आणि शहरापासून जवळच असलेल्या खेड्यातील रहिवाशी महिलेने काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा शहरात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बिऊटी पार्लर कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. येथे तिला दोन जिवलग मैत्रीनीं भेटल्या. पुढे त्यांची मैत्री घट्ट होत गेली. काही महिन्यांपूर्वी तिघी पुण्याला फिरायला गेल्या. यासाठी त्या विवाहितेच्या पतीचा विरोध होता. तरीही ती भांडण करुन, पुण्याला गेली. परत घरी आल्यावर तिच्या वागणुकीत अमुलाग्र बदल जाणवू लागला. यातच दिनांक २९ एप्रिल रोजी पती कामावर व सासू – सासरे शेतात असताना तिने घरातून विना अडथळा पळ काढला. एक चिठ्ठी लिहून त्यात सॉरी.. मला मोकळा श्वास घ्यायचाय.. लिहित सोबत तिच्या ४ वर्षाच्या मुलालाही ती घेऊन गेली.. घरी संध्याकाळी परतलेल्या सबंधितानी महिलेला घरात व आसपास पाहिले. परंतु, ती आढळून आली नाही. सदर प्रकार लक्षात आल्यावर घरच्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महिलेची मिसिंगची तक्रार दाखल केली.
दरम्यान पोलीस ठाण्यात महिलेबाबत चौकशी केल्यावर स्थानिक पोलीस प्रशासनाकडून उडवा उडविचे उत्तरं मिळाली.. तपास संथ गतीने चालला असतानाच नमुद विवाहित महीला साधारण २० – २५ तरुणांची फौज आणि दोन महिलांच्या सोबत सात दिवसांनी पोलीस ठाण्यात अचानक आली. अनोळखी इसमांसोबत आलेल्या विवाहितेला पाहून घरच्या लोकांना घडलेला प्रकार लक्षात आला. यावेळी सदर महिलेने नातेवाईकांसोबत जाण्यास नकार दिल्याचे पोलीस जबाबात नमुद केले. आणि सोबत आलेल्या आक्काबरोबरच जाण्याची तयारी दर्शवली.
अनोळखी व्यक्तीच्या बरोबर जाण्यास घरच्यांनी हरकत घेतल्याने पोलिसांनी सदरील महिलेला पोलीस ठाण्यातून पळून जाण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप कुटुंबातील लोकांनी केलाय..! तसेच, श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचे हातं या प्रकरणात बरबटल्याचेही पिडीतांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या दबावानंतर उशिरा त्या महिलेला पोलिसांनी शोधत सुधारगृहात दाखल केल्याची माहिती मिळाली.. व सुधारगृहात समुपदेशनासाठी दाखल केलेली ती महीला तेथूनही पळाली असल्याचे समजले आहे.
श्रीगोंदा शहरात आणि तालुक्यात चालू असलेले हे रॅकेट अनेकांचा प्रपंच उद्वस्थ करण्यास कारणीभूत ठरत असुन, काही अनधिकृत उद्योग आणि देह विक्रीच्या माध्यमांतून महिलांचे शोषण करून, त्यावरील मलिदा खाणारी यंत्रणा सक्रीय झालेली आहे. चांगल्या दिसणाऱ्या महीला हेरून, त्यांच्या सोबत मैत्री करत, त्यांना फिरायच्या नावाखाली चमक/धमक, ऐशो आराम दाखवून, कुटुंब आणि नातेवाईकांपासून दुर करणे. तसेच, वाम मार्गात रस निर्माण करून, सामाजिक किंवा वैवाहिक जीवनापासून दुर लोटत त्या विवाहित महिलेला देह व्यापारात ढकलणे.. त्यासाठी तिची मानसिक व बौद्धिक तयारी करणे.. असे प्रकार श्रीगोंदा शहरात वाढत चालले आहेत. अश्याच प्रकारे महाविद्यालयीन मुलींनाही जाळ्यात ओढत त्यांचेही आयुष्य बरबाद केल्याचे अनेक उदाहरण समोरं येत आहेत. वाढती बाल लैंगिक अत्याचारांची प्रकरण याचाच एक भाग म्हणावा लागेल.
या सर्व विदारक परस्थितीत पोलीस मात्र, हतबल असल्याचे दिसतं आहे. पिडीत अल्पवयीन असल्यास कायदेशीर दृष्ट्या पोलिसांना अधिकार आहेत. पण, वय पुर्ण असणाऱ्या महिला किंवा मुलींच्या प्रकरणांत पोलीस यंत्रणा काही करु शकत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
एकंदर वाढत चाललेल्या अश्या प्रकरणांत काही सामाजिक संघटना समुपदेशन केंद्र चालवत असुन, स्थानिक कार्यकर्ते श्रीगोंद्यातील हे रॅकेट उद्धवस्त करण्याची तयारी करीत असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. तसेच, पिडीतांनी त्यांच्या घरातील महिलेला फूस लावनाऱ्या आक्का, जमलेल्या २० – २५ जणांसह पोलीस वर्दीतील त्या दलालावर गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे.
स्रोत:(पोलीस, पिडीत कुटुंब, सामाजिक संघटना)
