या भीषण अपघातातील मृतांची संख्या वाढली..! ओव्हरटेक करण्याच्या नादात झाला हा अपघात..

दिनांक ५ मे २०२४, श्रीगोंदा:

काल दिनांक ४ मे रोजी दुपारी ३:०० ते ४:०० वाजणेच्या सुमारास ढवळ गाव शिवारात एस्टी बस आणि एरीटीगा कारच्या अपघातात पारगाव सुद्रिक येथील दत्तात्रय बळीराम खेतमाळीस, भाऊसाहेब बापू मडके, हरिभाऊ तुकाराम लडकत, विश्वनाथ लक्ष्मण ननवरे, या चार लोकांचा या अपघातांत मृत्यु झाला होता. तर, तीन जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यातील सदर इरीटीगा कारचे चालक विठल ढोले राहणार लोणी व्यंकनाथ यांचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या संख्या वाढ होऊन पाच झाली आहे.

अपघातांत मयत झालेल्या चार जनांवर काल रात्री पारगाव सु. येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटने मुळे संपूर्ण गाव दुःखात बुडाले आहे. मयत झालेल्या व्यक्तीपैकी तीन जण पारगाव सोसायटी संचालक आणि एक जण व्हाईस चेरमन होते. हे सर्वजण अनेक वर्षांपासून मित्र होते. मित्रांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

म्हणून, ते बचावले
काल पारगाव येथुन एकूण आठ व्यक्ती आळंदी येथे देव दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यातील गोपीनाथ हिरवे हे कामानिमित्त पुण्यातच उतरले. आणि उर्वरित सात जण परतीच्या प्रवासाला पारगाव कडे निघाले असता. त्यांच्या वाहनाचा मध्येच अपघात झाला. त्या मध्ये आत्तापर्यंत पाच जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. दैव बलवत्तर म्हणून, हिरवे या अपघातातून बचावले. परंतु, आपल्या मित्रांच्या अपघाती जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

एस टी चालक संतोष बाजीराव गावडे यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून एम एच १२ टी वाय ४३५२ या वाहनाच्या चालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओव्हरटेक करण्याच्या नादात भिषण अपघात..
एस टी चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार सदर इरटीगा गाडीचा चालक समोर चाललेल्या ट्रॅक्टरला ओव्हर टेक करत असताना, वळणाचा रस्ता आणि वाहन नियंत्रित न झाल्याने, हा अपघात झाला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकाने वाहतूक नियंमांचे पालन करणे गरजेचे आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply