श्रीगोंदा येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता..

दिनांक ४ मे २०२४, श्रीगोंदा:

दिनांक १८/१०/२१ रोजी श्रीगोंदा एसटी स्टँड व बाजारतळ परिसरातील भीक मागणारे नामदेव सुनील भोसले उर्फ लंगड्या पारधी याने श्री बापू विष्णू ओव्हाळ यांना दारू पिण्यास पैसे मागितले असता बापू विष्णू ओहोळ याने सदर लंगड्या पारधी यास दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग येऊन बापू ओव्हाळ याचे तोंडावर हाताने ठोसे मारून जखमी केले व गळ्याला कपड्याने आवळून बाजारतळ अण्णाभाऊ साठे चौकातील नगर परिषदेचे बंद गाळ्याचे बाजूला लेंडी नाळ्याजवळ झुडपामध्ये नेऊन टाकले व त्यात ते मयत झाले.

बाबत श्री बापू विष्णू ओव्हाळ यांचे भाचे श्री सुनील भागचंद घोडके यांनी श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे आरोपी नामदेव सुनील भोसले यांच्याविरुद्ध दिनांक १९/१०/२१ रोजी भादवि कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी दिलीप तेजनकर यांनी करून पुरावा प्राप्त करून माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केले. त्यानंतर त्यास सेशन केस नंबर देऊन आरोपीचा चार्ज फ्रेम करून खटल्याचे कामकाज सुरू झाले.

त्यावेळी आरोपीच्या वतीने वकील म्हणून विधी व सहाय्य समिती तर्फे ॲड. दत्तात्रय डी.बी.झराड यांची नियुक्ती झाली. सदर खटला सुरू झाल्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीने एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. परंतु, सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा व परिस्थितीजन्य पुरावा मेहरबान कोर्टात पुढे साबित करू शकले नाहीत.

त्यामुळे आरोपीस माननीय एम.एस.शेख साहेब अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी संशयाचा फायदा घेऊन सदर आरोपीस भा.द.वी कलम ३०२, २०१ च्या आरोपातून निर्दोष मुक्त केले.

आरोपीच्या वतीने एडवोकेट दत्तात्रय डी.बी.झराड यांनी कामकाज पाहिले व त्यांना ॲड. सचिन झराड, ॲड. स्वप्निल होले, ॲड. राजन नहार, ॲड. चैत्राली साळुंके व प्रेरणा धेंडे यांनी सहकार्य केले. सदर आरोपीस न्याय मिळवून दिल्यामुळे वकिलांचे सर्व क्षेत्रामधून कौतुक होत आहे.

स्रोत:(प्रेरणा धेंडे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading