#ACCIDENT.. ढवळगाव हद्दीत झालेल्या अपघातात पारगावतील चार जणांचा मृत्यु.. तीन जण जखमी..

दिनांक ४ मे २०२४, श्रीगोंदा:

तालुक्यांतील पारगाव येथील रहिवाशी असलेल्या मडके आणि खेतमाळीस कुटुंबातील लोकांचा प्रवासादरम्यान आज दुपारी तीनच्या सुमारास एस टी आणि एरीटीगा वाहनाच्या धडकेत एरीटीगा मध्ये प्रवास करणारे पारगाव येथील दोन जण घटनास्थळी तर दोन जण उपचारा दरम्यान मृत्यु झाले आहेत. इतर तिन जण शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, एसटीत प्रवास करणारे सुमारे सोळा प्रवाशी सुखरूप असून, काहीना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते आहे.

पोलीस आणि आगार कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजनेच्या सुमारास श्रीगोंदा येथून शिरूर साठी मार्गस्थ झालेल्या एस टी बसचा रायगव्हण चारी जवळील साई कृपा मंगल कार्यालयापुढे असलेल्या चढावर ढवळगाव शिवारात दुपारी ३:०० वाजनेच्या आसपास शिरूर कडून पारगाव कडे जाणाऱ्या एरीटीगा गाडीने चुकीच्या दिशेने जात एसटी ला जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले असून, एस टी चालक आणि वाहक बेलवंडी पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करीत आहेत.

स्रोत:(पोलीस, एसटी कर्मचारी आणि प्रवासी)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading