श्रीगोंदयात खुनाचा प्रयत्न,मारहाण दुखापत, गर्दीत मारामारी,गावठी हातभट्टी गाळणे असे १३ गुन्हे दाखल असलेला आरोपी गजाआड..

दिनांक १४ जून,उरुळीकांचन:

एक महिन्यापासून फरारी असलेला अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केला आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी मध्यमांना दिली आहे. अटक केलेल्या सराईताचे नाव दत्ता उर्फ भावडया भिमा लोंढे वय ३० वर्षे रा.उरुळीकांचन ता. हवेली जि.पुणे असून, तो एक महिन्यापूर्वी घडलेल्या खुनी हल्ल्यात फरारी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ७ मे २०२० रोजी रात्री १०.१५ वा. चे सुमारास आकाश अशोक लोंढे वय २३ वर्षे रा. उरुळीकांचन, इंदिरानगर हा त्याचे मोटर सायकलवरून डाळींब – उरूळीकांचन रोडने जात असताना, त्यास आडवून व खाली उतरवून, पूर्वी झालेल्या शाब्दीक बाचाबाचीचे कारणावरून शिविगाळ व दमदाटी करून, दत्ता भिमा लोंढे याने त्याचे कडील कोयत्याने व त्याचे इतर ५ साथीदार यांनी लोखंडी रॉड, दांडक्यानी फिर्यादीस ‘तुला जिवंत सोडणार नाही.’ असे म्हणून, गंभीर मारहाण दुखापत व डोक्यावर कोयत्याने वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत फिर्यादी आकाश लोंढे याने हॉस्पीटलला उपचार घेत असताना दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला . यातील ६ आरोपीं पैकी ५ आरोपी अटक होते.मात्र, मुख्य आरोपी दत्ता लोंढे  फरार होता. तो अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी लोणीकाळभोर तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, मारहाण दुखापत, गर्दीत मारामारी, गावठी हातभट्टी गाळणे असे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. लॉकडाऊन संचारबंदीचे कालावधीत घडलेल्या सदर गंभीर खुनी हल्ल्यातील आरोपी फरार होता. त्यास पकडणे कामी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading