पिकअपच्या धडकेत नऊ वर्षांचा मुलगा ठार.. आरोपी फरार..

दिनांक १४ जून,श्रीगोंदा:

शहरातील मांडवगण रोड वेशीकडून बगाडे कॉर्नरकडे दुचाकीवरून जाणारे योगेश सुभाष कदम आणि त्यांच्या दुचाकीवर असलेला आयुष जयेश कदम (वय ९ वर्षे) यांना पाठीमागून आलेल्या पिकअपने (नंबर एम.एच.१६ क्यु ४६५) उघडविल्यामुळे आयुष जयेश कदम दुचाकीवरुन रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या अंगावरून पिकप गेल्याने त्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल दिनांक १३ जून रोजी घडली. यानंतर पिकप चालक घटनास्थळा वरून फरार झाला.आढळगाव रोडने त्याने पलायन केल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. याघटनेने सर्वत्र आयुषसाठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ही घटना मांडवगण रोडवरील दिल्ली दरवाजा वेशीजवळ कसरे हॉस्पिटल समोर घडली. आयुष कदम हा श्रीगोंदा येथील प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत होता. डॉ.जयेश कदम आणि डॉ. वंदना कदम यांचा तो मुलगा होता. डॉ.कसरे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा शहरातील शाडूचा मळा येथील मारुती छबा म्हेत्रे या पिकअप चालकावर भादवि कलम ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दहिफळे करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading