दिनांक ४ सप्टेंबर २०२५ श्रीगोंदा:
कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी दाखल केलेल्या खटल्यात, औरंगाबाद येथील समतानगरचे रहिवासी श्री. सोमनाथ सखाराम गायकवाड यांना चेक वटणास नकार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.

हा निकाल मा. न्यायाधीश एच. जे. पठाण यांच्या न्यायालयात ३० ऑगस्ट २०२५ रोजी दिला गेला. भारतीय चलनधोरण अधिनियम १८८१ मधील कलम १३८ अंतर्गत आरोपीस १ वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तसेच, चेकच्या रकमेच्या दुप्पट म्हणजेच ₹१२,९७,३०६ इतकी नुकसानभरपाई तक्रारदार संस्थेला अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर रक्कम न भरल्यास आरोपीस आणखी २ महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

तक्रारदार संस्थेच्या वतीने खटल्याचे कामकाज ऍड. पुरुषोत्तम जगन्नाथ फाटे यांनी केले. त्यांच्या प्रभावी युक्तिवादाच्या आधारे हा निकाल लागला. तसेच, श्री. संदीप अरुण कोठारे व श्री. तुषार मन्सिंग काकडे यांनी संस्थेच्या वतीने महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
