श्री शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे “शिक्षक दिन” साजरा..

दिनांक ४ सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा:

उपस्थित मान्यवर..

श्री शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे “शिक्षक दिन” अतिशय उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सुंदर सांस्कृतिक सोहळ्याबरोबरच शिक्षकांचा सन्मान करत विविध उपक्रम राबवले.

विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत सादर केलेली लॉ ऑफ एव्हिडन्स, भारतीय साक्ष अधिनियम तसेच कॉन्स्टिट्यूशनल लॉ यांवरील प्रभावी व्याख्याने होती. या सत्रात सौ. निलम धेंडे, आरती शेंडगे, प्रदीप कुरुमकर व जयदीप पाचपुते यांनी उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर केला.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे तिन्ही C.R – शोएब खान, पूजा बेंद्रे व अश्विन वाघमारे तसेच इतर विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे कुशल संचालन श्री अश्विन वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री रमेश चावरिया यांनी केले.

या सोहळ्यास प्राचार्य डॉ. अंजुला चौबे, प्रा. पुरुषोत्तम फाटे, प्रा. रूपाली गोडे व प्रा. साक्षी प्रथमशेट्टी उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे मनःपूर्वक कौतुक केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading