दिनांक ३१ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:
दिनांक १० ऑगस्ट २०२३ च्या फिर्यादी वरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ७२६/२३ गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी यास दिनांक १५सप्टेंबर २०२३ रोजी सापळा रचून श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकारी यांनी पूर्ण करून दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी श्रीगोंदा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब -नंबर २ यांच्या कोर्टात दोषारोप पत्र दाखल केल्याने सदर खटल्याचे कामकाज स्पेशल केस नंबर १६२/२३ नुसार सुरु झाले.
मा. न्यायालया समोर फिर्यादी व पीडितेचा सरकारी पक्षाने नोंदवलेला सरतपास व आरोपीच्या वतीने ॲड.रणजित शिरोळे यांनी फिर्यादी व पीडितेचा घेतलेला उलटतपास यामध्ये विरोधाभास निर्माण झाल्यामुळे मा. न्यायालयाने आरोपीची गंभीर गुन्ह्यातून पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. सदर आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट रणजित शिरोळे यांनी कामकाज पाहिले.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)
