दिनांक ३१ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील बगाडे कॉर्नर ते शनी चौक आणि बायपास रोडवर केलेल्या रस्त्याच्या कामामुळे शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचे वातावरण निर्माण झाले असुन, परीसरात या धुळेने नागरीक हैराण झाले आहेत. मुळात रस्त्यावर हाथरण्यात आलेली डस्टही वॉशेबल डस्ट नसल्याने हे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वॉशेबल डस्ट ही येथे वापरण्यात आलेल्या डस्टच्या तुलनेत चार पट अधिक महाग असल्याने, या कामाच्या ठेकेदाराने पैसे वाचवण्यासाठी हा प्रयोग केलेला आहे. मात्र, तो श्रीगोंदा शहरातील नागरिकांच्या चांगलाच अंगलट आलेला आहे. शिवाय लोकांचे आरोग्य यामुळे धोक्यात येण्याची परस्थिती निर्माण झालेली आहे.



स्त्रोत:(अधिकृत माहिती)
