३ फेब्रुवारी रोजी नगर येथे होणाऱ्या ओबीसी/भटके विमुक्त महा एल्गार सभेस समाज बांधवांना सोबत घेऊन, फुले – शाहु – आंबेडकरी विचारांच्या आरक्षण आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन..

दिनांक १ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी/भटके विमुक्त महा एल्गार सभेसंदर्भात माहिती देण्यासाठी श्रीगोंदा शहरात अखिल भारतीय महत्मा फुले समता परिषद व समाज बांधवांमार्फत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सावता परीषद, मुस्लिम बांधव, ओबीसी समाजाचे प्रतिनिधी, भटके/विमुक्त समाजाचे पदाधिकारी आणि बहुजन समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत गोरख आळेकर यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले. त्यांनी नमूद केले की, दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या महा एल्गार मेळाव्याला हजर राहण्यासाठी विवीध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रं दिवस समाज बांधवांच्या घरो घरी भेटी घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे. आळेकर यांनी सांगितले या सभेसाठी हजोरोंच्या संख्येने लोकं, तालुक्यातील शेडगाव येथून ज्योत प्रज्वलित करून निघणार आहेत. पुढे सदरील रॅली टाकळी – आढळगाव – श्रीगोंदा शहर – पारगाव – घारगाव – कोळगाव – अरनगाव मार्गे नगर येथे पोहचणार आहे. प्रत्येक गावात शेकडोंच्या संख्येने चारचाकी गाड्या आणि मोटरसायकल स्वार समाविष्ट होणारं आहेत. साधरण २५०० वाहनांचा ताफा शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन स्थळी जाणार आहे. कोणत्याही प्रकारे या आंदोलनाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली जाईल.. obc बांधवानी दबाव तंत्राला बळी पडू नये.. हि महा एल्गार परीषद यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.. असे त्यांनी सुचविले आहे.

या पत्रकार परिषदेत शरद जमदाडे, भाऊसाहेब कोळपे, मुकुंद सोनटक्के, मनीषा काळे, राजुदादा गोरे, ऋषिकेश शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे तालुकाध्यक्ष संजय डाके यांनी सांगितले की, आत्ता obc समाज जागा झाला आहे. ओबीसीचे राष्ट्रीय नेते ना. छगन भुजबळ यांनी उभारल्या आरक्षण बचाव आंदोलनात सहभागी होत सामाजिक ताकद दाखवने गरजेचे झाले आहे. झुंडशाही करून शासन वाकवण्याचा प्रयत्न केला जात असुन, फुले शाहु आंबेडकरांच्या विचारांचे पिवळ वादळ घेऊन नगरला वैचारिक भुमिका मांडण्यासाठी समाजाने एकत्र यावे. बहुजनांनी हक्कांसाठी रस्त्यांवर उतरून जातीसाठी माती खाण्याची तयारी दाखवली पाहिजे. असेही डाके यांनी यावेळी सांगितले.

अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.. ज्यात त्यांनी समाज बांधवांना नमूद सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन आरक्षण मिळवण्यासाठी पुढे यावे.. असेही मत व्यक्त करण्यात आले. तर, सध्य परस्थिती भयानक आहे.. हि वैचारिक लढाई आहे.. शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन पुर्ण करावे.. तरुणांनी शांतता राखावी व यशस्वितेसाठी प्रयत्न करावेत. असे म्हणणे मांडले.. यावेळी तालुक्यातून उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आयोजकांनी अभ्यासपूर्ण उत्तरं दिली.

पत्रकार परिषदेत सुरेश सुपेकर, मुकुंद सोनटक्के, राहूल राऊत, शरद जमदाडे, राजु गोरे, विजय शेंडे, ऋषिकेश शेलार, ओंकार शिंदे, मनीषा काळे, सागर वाकडे, जालिंदर बोडखे, गणेश शिंदे, बंडोपंत कोथंबीरे, संजय डाके, गोरख आळेकर, पांडूशेठ गांजुरे, भाऊसाहेब कोळपे, दस्तगीर इनामदार, प्रमोद कोरडे, खलील पठाण सह बहुजन व ओबीसी, भटके/विमुक्त समाज बांधव उपस्थित होते. या प्रसंगी विजय शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

स्त्रोत:(पत्रकार परिषद)

पत्रकार परिषदेस संबोधित करणारे मान्यवर..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading