श्रीगोंद्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.., ६.१६ लाख रुपयांचा पानमसाला आणि गुटखा जप्त; एक आरोपी अटकेत, दोघे फरार..

दिनांक १५ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

गजानन कॉलनी, श्रीगोंदा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत ६,१६,२०४ रुपये किंमतीचा पानमसाला व गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपी रवी बबन दळवी (वय ३९ रा. रोकडोबा चौक, श्रीगोंदा) याला ताब्यात घेण्यात आले असून, इतर दोन आरोपी फरार आहेत.

पोलीस अधीक्षक मा. श्री. राकेश ओला यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवैध धंद्यांच्या तपासासाठी ही कारवाई केली. पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रवी दळवी हा करमाळा, जिल्हा सोलापुर येथील शकील तांबोळी व शोएब शकील तांबोळी यांच्याकडून महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला पानमसाला व गुटखा विक्रीसाठी आणून गजानन कॉलनीतील गोडाऊनमध्ये साठा करीत असल्याची माहिती मिळाली होती.

दिनांक १३ ऑगस्ट रोजी पथकाने गजानन कॉलनीतील वडळी रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. या कारवाईत १,३०,६८० रुपयांचा विमल पानमसाला, १६,२०० रुपयांचा आरएमडी तंबाखु, ३६,००० रुपयांची आरएमडी सुपारी, १८,९०९ रुपयांची विमल व्ही वन तंबाखु, ६,००० रुपयांचा हिरा पानमसाला आणि ४,००,००० रुपयांची टाटा सुमो गाडी असा एकूण ६,१६,२०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर गुन्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशन भा.दं.वि. कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई श्रीगोंदा पोलीस स्टेशनद्वारे सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्रोत:(प्रसिध्दी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading