दिनांक १५ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
शहरातील वडाळी रोडवरील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये आज सकाळी एक मोठी घरफोडीची घटना घडली. पुरुषोत्तम जगन्नाथ फाटे (वय ३०) या वकीलाच्या घरातून लाखो रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, व मोबाईल फोन चोरीला गेले.
घटनेची माहिती देताना फाटे म्हणाले की, सकाळी ७:०० वाजता ते, त्यांची पत्नी आणि मुलगी सोबत ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुलीच्या शाळेत गेले होते. घर बंद करून ते गेले असता, चोरट्यांनी संधी साधली. दुपारी १२:५० वाजता घरी परतल्यावर, फाटे यांना बाहेरील दरवाज्याचे कुलूप तोडलेले दिसले. घरात प्रवेश केल्यावर त्यांना कपाटातील दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल गायब असल्याचे दिसले.
फाटे यांनी तातडीने पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील लाखों रुपये किमतीचे सोन्याचे कानातील कर्णफुले, सोन्याचे गळ्यातील मिनीगठंण, चांदीचे पायातील पैजन आणि रोख रुपये लंपास केले आहेत. तसेच सॅमसंग कंपनीचा A6 मॉडेलचा फोनही चोरट्यांनी गायब केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
स्रोत:(फिर्याद)





