श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या गेटसमोर गटार सदृश्य परिस्थिती; नागरिकांच्या तक्रारी वाढल्या..

दिनांक १६ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या परिसरात, प्रशासनिक वाहन धुण्यामुळे दररोज पाण्याचे डबके आणि वाहणारे पाणी साचून परिसरात गटार सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पाण्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रारी किंवा इतर कामानिमित्त आलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पोलीस प्रशासनाची जीप धुण्यासाठी साधारण १५ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, आज या कार्यासाठी तब्बल दोन तासांचा कालावधी लागला, ज्यामुळे पोलिस ठाण्याच्या गेटसमोर चिखल आणि गटारीसारखी परिस्थिती निर्माण झाली. ठाण्यातील बोरवेलमधून गाडी धुण्यासाठी जास्त वेळ वापरण्यात आल्याने परिसरात पाण्याचे डबके साचले आहेत.

यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला असून, प्रशासनाने या समस्येवर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. या परिस्थितीमुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून, आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. नागरिकांच्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन, प्रशासनाने तत्काळ पाणी व्यवस्थापनात सुधारणा करणे गरजेचे आहे.

स्रोत:(नमुद परस्थिती)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading