श्रीगोंदा पोलिसांची कारवाई: भानगाव शिवारातील शेतातून ₹८१,३५० किंमतीचा गांजा जप्त..!

श्रीगोंदा | दि. ७ ऑगस्ट २०२५

Check out this shop on Meesho – https://www.meesho.com/AARAVPRODUCT?_ms=3.0.3

श्रीगोंदा पोलिसांनी भानगाव शिवारात गांजाची अवैध लागवड उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी शेतातून सुमारे ₹८१,३५०/- किंमतीची गांजाची झाडे जप्त करत आरोपी प्रवीण मानसिंग काळे वय २५ याला ताब्यात घेतले आहे.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोनि किरण शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, भानगाव शिवारात एका इसमाने त्याच्या शेतात घरासमोर गांजाची लागवड केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी पोना/अरुण पवार व पोकॉ/मयुर तोरडमल यांना खात्री करण्यासाठी पाठवण्यात आले. बातमी खरी असल्याचे निदर्शनास आल्यावर, सपोनि गणेश अहिरे, मपोकॉ अस्मिता शेळके, चालक सफौ शिर्के आणि दोन शासकीय पंच यांच्यासह सरकारी वाहनातून छापा टाकण्यात आला.

छाप्यात शेतामध्ये गांजाची झाडे आढळून आली. त्याची अंदाजे किंमत ₹८१,३५०/- इतकी असून पंचासमक्ष पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध पोलीस कर्मचारी पोकॉ अरुण पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सपोनि गणेश अहिरे करीत आहेत.

ही कारवाई मा. श्री सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), मा. श्री वैभव कलबुर्मे (अप्पर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), मा. श्री प्रविणचंद्र लोखंडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत) तसेच पोनि किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत सपोनि गणेश अहिरे, पोउपनि संपत कन्हेरे, पोना/संग्राम जाधव, पोकॉ/अरुण पवार, पोकॉ/मयुर तोरडमल, पोकॉ/संदीप शिरसाठ, पोकॉ/रवी जाधव, पोहेकॉ वाबळे, मपोकॉ/अस्मिता शेळके आणि चालक सफौ/शिर्के यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

स्रोत:(श्रीगोंदा पोलीस)

Whatsapp -> https://link.meesho.co/ANEx1bWVlA (+919405270560)
Catalog Name:Chitrarekha Superior Sarees
Saree Fabric: Lycra Blend
Blouse: Separate Blouse Piece
Blouse Fabric: Velvet
Pattern: Solid
Blouse Pattern: Product Dependent
Net Quantity (N): Single
Sizes:
Free Size (Saree Length Size: 5.3 m, Blouse Length Size: 0.8 m)

Dispatch: 1 Day

*Proof of Safe Delivery! Click to know on Safety Standards of Delivery Partners- https://ltl.sh/y_nZrAV3

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading