सामूहिक अत्याचार; उसाच्या शेतात नेऊन महिलेवर आळीपाळीने बलात्कार, परिसरात संतापाची लाट.. श्रीगोंदा तालुक्यातील आरोपीचा सहभाग..!

दिनांक ७ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा/दौंड(पुणे):

लघुशंकेसाठी घराबाहेर गेलेल्या एका महिलेला ऊसाच्या शेतात जबरदस्तीने नेऊन सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील एका गावात मंगळवारी (ता. ५ ऑगस्ट) रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, दौंड तालुक्यातील चार जण आणि काष्टी तालुका श्रीगोंदा येथील एक अश्या पाच जणांविरुद्ध, अत्याचार व दमदाटीचे गंभीर आरोप आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या वडिलांच्या घरी आली असताना ती रात्री घराच्या मागील बाजूस लघुशंकेसाठी गेली होती. त्यावेळी वरील आरोपी तिथे आले. त्यांनी महिलेवर दबाव टाकत, “तु आमच्या घरी पोलीस का पाठवले?” अशी दमदाटी केली. महिलेने नकार दिला असतानाही, दोघांनी तिचे कपडे फाडून अत्याचार केला. दरम्यान, तिघांनी तिला पकडून ठेवले होते.

दोन आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केल्यानंतर त्यांनी पीडितेला ८:२० वाजता सोडून दिले व धमकी देत तिथून पळ काढला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात BNS कलम ७०(१), ३५२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Catalog Name:Latest Deodorant & Fragrances
Type: Deodorant
Brand: Denver
Flavour: No Flavour
Net Quantity (N): 1

Dispatch: 2-2 Days

*Proof of Safe Delivery! Click to know on Safety Standards of Delivery Partners- https://ltl.sh/y_nZrAV3

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading