श्रीगोंद्यातील ५७ दखलपात्र गुन्ह्यांचे स्वरूप कमी केल्याने, संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधीक्षक पाटलांनी घेतले रडारवर..!

दिनांक ३ जानेवारी, श्रीगोंदा:

पोलिसांकडे तक्रार दाखल करायला जाणाऱ्या तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन, योग्य पद्धतीने तक्रार दाखल करण्याऐवजी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देणे, तलवारीने हाणामारी, गंभीर स्वरूपाची दुखापत, रॉड, कुऱ्हाड, फावडे, चाकू अशाने झालेली मारहाण, ॲट्रॉसिटी सारख्या गुन्ह्यांच्या नोंदी करण्याऐवजी साधी एनसी दाखल करून घेणे. असे प्रकार करणाऱ्या जिल्ह्यातील ५८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनोज पाटील (अधीक्षक अहमदनगर) यांनी चांगलाच दणका दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकारांमुळे जिल्हा अधीक्षकांनी घेतलेल्या निर्णयाने जिल्ह्यातील पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. काहींना सक्त ताकीद देण्यात आली असून, कोणाला दंड, काहींची वेतनवाढ रोखणे तर, काहींना थेट मूळ वेतनावरच आणले आहे.

मागील वर्षात १२४३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १८१ गुन्ह्यांचे स्वरूप कमी करण्यात आले आहे. मागील वर्षी पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी असे उशिरा गुन्हे दाखल होतात याची समीक्षा केली.

काही प्रकरणात तर, तक्रारदार तडजोडीच्या उद्देशाने गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. तक्रार ज्यांच्या विरोधात आहेत त्यांची तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी वारंवार चौकशी करून, फक्त त्रास दिला जावा असा छुपा हेतू ठेवला. तर, दाखल गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसले तर, वरिष्ठ रडारवर घेतील. कामकाज योग्य पद्धतीने सुरू नाही, म्हणतील आणि प्रक्रियेत तपासाचा तानही वाढेल, अशी अनेक पोलिस अधिकाऱ्यांची मानसिकता होती.

त्यामुळे अनेक गुन्हे दाखल करून घेतले जात नव्हते. एकंदरीतच गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याने चुकीच्या तक्रारींचे प्रमाणही कमी झाल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. गुन्हे वाढणे म्हणजे प्रशासनाचे काम खराब आहे..! असे समजले जात नाही. केवळ मालमत्तेच्या संदर्भात दरोडे, चोऱ्यांसारख्या गुन्ह्यात उत्तर द्यावे लागेल. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यात मागच्या वर्षी १२४३ गुन्हे उशिराने दाखल झाले. यात नगर शहरात १५१, नगर ग्रामीणमध्ये २१७, कर्जतला १६२, शेवगावला २५६, श्रीरामपूरला १५८, शिर्डीला १३४ व संगमनेरला १६५ गुन्हे आहेत. After reducing the nature of 57 notifiable crimes in Shrigonda, Superintendent of Police took the concerned police officers and staff on the radar ..!

तसेच, १८१ प्रकरणांमध्ये गुन्ह्याचे स्वरूप कमी केले गेले होते. यात जामखेड पोलीस ठाण्यात ११, एमआयडीसी पोलीस ठाण्यात १०, बेलवंडीला ३०, कोपरगावला ९, लोणीला ६, नेवाशाला ९, पाथर्डीला ६, राजूरला ५, तोफखान्याला ४, कर्जतला ११, पारनेरला ११, घारगावला १२, अकोल्यात १, भिंगार कॅम्पला १६, श्रीगोंदा २७, शेवगाव ५, संगमनेर ५ व नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील ३ प्रकरणांचा समावेश होता.

गुह्याचे स्वरूप कमी करून अदखलपात्र गुन्हे दाखल केले गेले होते. त्यामुळे यातील सर्व ५८ दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी २९ जणांना सक्त ताकीद दिली आहे. १३ जणांना दंड केला आहे. ११ जणांची वेतनवाढ रोखली. तर, ५ जणांना मूळ वेतनावर आणले आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply