ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी सुरू केलेले आंदोलन, तोंडी आश्वासनानंतर स्थगित..

दिनांक ४ जानेवारी, श्रीगोंदा:

ग्रामसेवक गवांदे आत्महत्या प्रकरणात वलगुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच राम घोडके यांना चुकीच्या पद्धतीने ओवण्यात आले. स्थानिक राजकारन्यानीं सरपंच व त्यांच्या संबंधितांना पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने या प्रकरणाला वेगळे वळण देत, निरपराध राम घोडके यांना अडकवण्याचे षड्यंत्र केले आहे. असा आरोप रामदास घोडके यांच्या पत्नी अश्विनी घोडके यांनी केलाय. त्यांनी काल दिनांक ३ जानेवारी रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण केले. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या तोंडी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गवांदे आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागून, त्या प्रकरणाचे सर्व खापर राम घोडके यांच्या माथी फोडण्याचे काम राजकारणी, पोलीस यंत्रणेने मिळून केलेले आहे. राजकीय व जातीय द्वेषातून राम घोडके (उपसरपंच खांडगाव /वलघुड) यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले, सौ.मंगल कारभारी ढवळे व सरपंच पती कारभारी ढवळे तसेच, इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्याबद्दल दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी फिर्यादीने लिहिलेल्या लेखी निवेदनातील सवर्ण इसमांना जाणून बुजून वगळण्यात आले,

फिर्यादीने दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रतिभाताई भद्रकाली नारशक्ती संस्था पुणे यांना लिहिलेल्या निवेदनानंतर दिनांक ३ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी उशिरा श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला, दरम्यान कालखंडात फिर्यादीचे व त्यांच्या कुटुंबाबरोबर कोणी कोणी फोनद्वारे संपर्क केला..? याचे कॉल डिटेल्स घेण्यात यावेत, या गुन्ह्यात केवळ अनुसूचित जातीतील सुशिक्षित व सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या दोन तरुणांना गुंतवण्यात आले, या षडयंत्रात सामील असणाऱ्या सरपंच, सरपंच पती, बाळू महाडिक (जिल्हा सरचिटणीस भाजपा) व राम महाडिक यांची चौकशी करून, गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच, सह्या खोट्या केल्या असे म्हणणाऱ्या सरपंच व सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवाल व पंचनाम्यावर सह्या कशा केल्या..? याची चौकशी करावी,

या सर्व प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या जातीवादी सहाय्यक पोलीस निरीक्षक API विठ्ठल पाटील यांची चौकशी करावी, या प्रकरणातील षड्यंत्रवादी, जातीवादी, पुढारी, मार्गदर्शक, नेते व असंविधानिक मदत करणारे पोलिस प्रशासनाचे अधिकारी यांच्यावर ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करावा. या मागण्यांसाठी अश्विनी उर्फ शितल रामदास घोडके यांनी उपोषण सुरू केलते. मात्र, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी सदर उपोषण थांबवले आहे.

या उपोषणाला बहुजन समाज पार्टीचे (जिल्हा प्रभारी) सुनील ओहोळ, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे (जिल्हा उपाध्यक्ष) अमर घोडके, नितीन जावळे, भालचंद्र सावंत, Ad प्रकाश लोंढे, आबा रामफळे, बाबासाहेब ओहोळ सह सामाजिक, राजकीय पदाधिकार्‍यांनी भेट दिली.

स्रोत:(आंदोलन)

Leave a Reply