मुंबई शहर पोलीसात गणेश चव्हाण यांची नियुक्ती..

दिनांक ६ जानेवारी, श्रीगोंदा:

तालुक्यातील टाकळी लोणार येथील गरीब कुटुंबातील गणेश चव्हाण यांची मुंबई शहर पोलीस पदी निवड झाली.

त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण टाकळी लोणार. नंतर पदवी पर्यंतचे शिक्षण श्रीगोंदा या ठिकाणी झाले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गणेशला प्रेरणा ठरली ती आपल्या आई वडिलांनी शेतात कष्ट केलेली. कधी मोलमजुरी तर कधी मिळेल ते काम करून आपल्या मुलाला शिकवलं आणि त्याचं सोनं झालं. आईच स्वप्न सत्यात उतरलं. आईने आपल्या डोळ्यातील आनंदाश्रू ना वाट मोकळी करून दिली. आणि गणेशच्या या यशामध्ये आई-वडील, संपूर्ण कुटुंब, नातेवाईक, गावकरी, मोठा मित्र परिवार अतिशय आनंदाने सहभागी झाला.

शेतकरी कुटुंबातील गणेशच्या आईने विद्यार्थ्यांना दिलेला एक गोड संदेश खूप काही सांगून जातो. बाळांनो तुम्ही इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा की, तुमच्याकडे पाहताना आमची मान दुखेल इतकी तुम्ही मोठे व्हा. हे धाडस फक्त एक आईच आपल्या मुलाला देऊ शकते.

विद्यार्थ्यांच्या यशात गरुड झेप फक्त पथदर्शक आहे. त्या विद्यार्थ्यांची मेहनत त्यांच्या आई-वडिलांची काबाडकष्ट याची त्यांनी जाणीव ठेवली. त्यानुसार त्यांनी मेहनत घेतली. आज माझ्या आई-वडिलांची परिस्थिती गरिबीची आणि हलाखीची असेल परंतु, त्यांचे म्हातारपण मात्र, आनंदात असेल. ती माझी जबाबदारी आहे.

हे ज्या विद्यार्थ्यांना समजले. तो झपाटून जातो. मग परिस्थिती कितीही परीक्षा घेऊ दे, त्याला यशापासून कोणीच रोखू शकत नाही. जर, परिस्थिती खरंच गरीब असेल तर रडू, नका. तर लढा, आणि तिचा सामना करा. तिला सांगा की माझा जन्म तुलाच बदलण्यासाठी झालाय. ज्या अडचणी येतील त्याच संधीत रुपांतर करा. जेवढी कठीण परिस्थिती येते. तिच्यासोबत तेवढीच मोठी संधी असते.

जस नारळ जितकं कठीण असतं, खोबर तितकंच पौष्टिक आणि रुचकर असत. असे गणेश यांनी बोलताना सांगितले.

अभ्यासाची आवड असलेल्या गणेश आढळगाव येथील श्री. मधुकरजी ठवाळ साहेब सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त मुबई यांनी सुरू केलेल्या एबीसीडी अभ्यासिके मध्ये गणेशने अभ्यास करून, या यशाला आपलेसे करण्याचे नाविन्यपूर्ण काम केलं.

त्यामुळे एबीसीडी मध्ये अभ्यास करणाऱ्या ध्येयवेड्या विद्यार्थ्यांनी गणेशचा सत्कार केला. व्यक्ती हा समाजाचे प्रतिनिधित्व करतो. आपण समाजासाठी प्रेरणास्रोत ठरवलो पाहिजे. असे मत शेवटी सर्वांचे आभार मानताना श्रीकांत ठवाळ यांनी व्यक्त केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading