दिनांक ६ जानेवारी, श्रीगोंदा:
शिक्रापूर, चाकण रस्त्यावर ट्रक अनं पिकअपचा समोर समोर अपघात झालाय. यात पिकप चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर तालुक्यातील शिक्रापूर, चाकण रस्त्याने शिक्रापूर वरून चाकणच्या दिशेने जाणारा MH १२ NW १५१६ ट्रक समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून आलेल्या पिकअप क्र. MH ४२ AF००८२ ला जोराची धडक बसून, पिकप उलटला आणि त्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.
अपघात घडल्यानंतर नागरिकांनी ट्रक व पिकप चालकांना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने दवाखान्यात दाखल केले.(Road accident)
या भीषण अपघातात पिकपचे पूर्ण नुकसान झाले असून, पिकअप चालक दिपक दिनकर साबळे (शिरसगाव ता. श्रीगोंदा) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे पुढील तपास करत आहेत.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
