दिनांक ४ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:

अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून सुमारे ४ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजेपासून ते दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ०३.०० वाजेच्या दरम्यान घडली आहे.

या प्रकरणी अमोल पोपट आरेकर (वय ३८, रा. लोणी व्यंकनाथ, आरेकर वस्ती) यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३०५(अ) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादी अमोल आरेकर यांच्या घरातून चोरट्यांनी त्यांच्या संमतीशिवाय आणि फसवणुकीच्या इराद्याने

- रोख रक्कम: ५०० रुपये आणि १०० रुपये दराच्या नोटांसह ४,५०,०००/- रुपये.
- सोन्याचे दागिने: १.५ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, ज्याची अंदाजित किंमत ४५,०००/- रुपये आहे.
- एकूण मुद्देमाल: ४,९५,०००/- रुपये.
फिर्यादी अमोल आरेकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या ओळखीत असलेल्या इतर नागरिकांनी देखील त्यांच्या घरी चोरी झाल्याचे सांगितले आहे. यात खालील ठिकाणांचा समावेश आहे..
- एकूण मुद्देमाल: ४,९५,०००/- रुपये.
- गणेश शहाजी क्षिरसागर (रा. शेंडेवाडी, लोणी व्यंकनाथ) यांचे बाबुर्डी रोड लगत असलेले श्लोक सलून दुकान. संतोष पुंडलिक चाफे यांचे घर. संभाजी मारुती दिवखिळे यांचे घर. संगिता बापू कोकरे यांचे घर. (हे सर्व लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी आहेत.) या माहितीवरून परिसरात एकाच रात्री अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याचे स्पष्ट होते. या घटनेमुळे लोणी व्यंकनाथ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
- या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक भागवत हे करत आहेत. पोलीस एकाच वेळी झालेल्या या सर्व चोऱ्यांमागे एकाच टोळीचा हात आहे का,.?याचा तपास करत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

