दिनांक ११ एप्रिल(मढेवडगाव,श्रीगोंदा):
मढेवडगावात येथे बेकायदेशीररीत्या गावठी दारू विक्रीसाठी आणून अनावश्यक गर्दी जमविण्याच्या उद्देश बाळगल्याप्रकरणी सापडल्याने पोलिसांनी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत एकावर गुन्हा दाखल केला आहे.
आज शनिवार दिनांक ११ रोजी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना माहिती मिळाली की , मढेवडगाव येथे विनापरवाना बेकायदेशीर गावठी दारू विक्री चालू आहे. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित व पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे यांनी छापा टाकला असता एका घराच्या आडोश्याला १००० रुपयांची २० लिटर हातभट्टी दारू आढळुन आली. विक्री करणारी ज्योती रिखेश भोसले हिच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास साहाय्यक फौजदार भानुदास नवले हे करत आहेत.
