दिनांक १० एप्रिल(पेडगाव,श्रीगोंदा):
जगात कोरोना या रोगाने थैमान घातले आहे.या रोगाचा प्राधुरभाव रोखण्यासाठी २१ दिवस लॉकडाऊन आसल्यामुळे, श्रीगोंदा तालुक्यातील पेडगांव ग्राम – पंचायतच्या वतीने २२० गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किराणा, हॅन्ड सॅनीटायझर व हॅन्ड वॉश वाटप करण्यात आले.
यानिमित्त श्रीगोंद्याचे(पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव यांनी श्रीगोदा तालुक्यातील सर्व नागरिकांना आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन केले.
यावेळी (आरोग्य सेवक) नवनाथ काशिद, (सर्कल) अजबे (मा.सभापती) हरिदास शिर्के, (सरपंच) भगवान कणसे, (उपसरपंच) देवीदास शिर्के, ईरफान काझी, प्रकाश घोडके,प्रेम खेडकर उपस्थित होते.
(पत्रकार:शफीक हवालदार)
