श्रीगोंद्यात बँक अधिकाऱ्यावर हल्ला.. खातेदारावर गुन्हा दाखल..

दिनांक ३ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

घोडेगाव येथील राष्ट्रीयकृत बँकेत खातेदार आणि बँक अधिकारी/कर्मचारी यांच्यात खात्यातील तांत्रिक अडचणीमुळे बाचाबाची होऊन झालेल्या वादातून बँक शाखा अधिकारी यांच्यावर खातेदाराने हल्ला करून, मारहाण केली. त्यात अवचटे नामक अधिकारी जखमी झाल्याचे समोरं आले आहे. तर, खातेदारावर शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, काल दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी दुपारी २:०० ते ३:०० वाजनेच्या सुमारास लोणकर नामक खातेदार या बँकेत, आपल्या खात्याच्या माहितीसाठी घोडेगाव शाखेत गेला होता. त्याचे खाते काही तांत्रीक अडचणींमुळे होल्डवर होते. त्यामूळे अधिकारी किंवा बँकेतील कर्मचारी त्यावर कोणताही व्यवहार करण्यास असमर्थ होते. मात्र, तो खातेदार अधिकाऱ्यांच्या सूचनेवर समाधानी नव्हता. त्यातून कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात बाचाबाची झाली. आणि लोणकर या इसमाने बँकेच्या शाखाधिकाऱ्याला मारहाण केली.

या नंतर बँकेचे शाखा अधिकारी आणि कर्मचारी यांनी श्रीगोंदा पोलिसांत या प्रकरणी माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांत सरकारी कामात अडथळा निर्माण करून शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने लोणकरवर भादवी कलम ३५३, ३३२ सह ५०६ व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोणकर हा व्यक्ती घोडेगाव येथील शेतकरी असल्याचे समजले आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply