कोळगावचे सुपुत्र सुभेदार मेजर सुभाष लगड अनंतात विलीन.. लष्करी व शासकीय इतमामात मानवंदना.. जिल्हाधिकारी व सैन्य अधिकारी यांची श्रद्धांजली..

दिनांक ४ एप्रिल २०२४, कोळगाव, श्रीगोंदा:

येथील सुपुत्र सुभेदार मेजर सुभाष श्रीरंग लगड यांच्यावर कोळगाव येथे त्यांच्या राहत्या घराजवळ लष्करी व शासकीय ईतमामात अंत्यविधी पार पडला. अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धेश्वर सालीमठ तसेच, सैन्य अधिकारी यांनी लष्करी व शासकीय मानवंदना दिली. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील अनेक सैनिक संघटनेचे पदाधिकारी व कोळगाव परिसरातील शोकाकुल नागरिक उपस्थित होते.

कोळगाव येथील सुभेदार मेजर सुभाष श्रीरंग लगड (वय ४८) यांनी २७ वर्ष देश सेवा केली असून, ते ११६ टी ए प्यारा कमांडो, दिल्ली येथे लष्करी सेवेत कार्यरत होते. त्यांना दोन मुले एक इयत्ता दहावी व दुसरा बारावी मध्ये शिकत आहे. त्यांचे थोरले बंधू बाळासाहेब लगड हेही लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

सुभेदार मेजर सुभाष लगड सुट्टी निमित्त कोळगाव येथे आले होते. त्यांना चार-पाच दिवसांपूर्वी अचानक चक्कर आल्याने नगर येथे हलविण्यात आले. तेथून पुणे येथील लष्करी कमान हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. परंतु, दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०:५० वाजनेच्या सुमारास त्यांना तीव्र हृदयविकाराचा धक्का बसला. त्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृत्यूदेह आज कोळगाव येथे लष्करी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने पुणे येथून कोळगाव येथे आणण्यात आला. त्यांना मानवंदना देण्यासाठी नाशिक देवळाली येथील लष्करी टीम, गार्ड ऑफ ऑनर, आर्म फोर्स, मेकॅ. इन्फंट्री, जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड, अहमदनगरचे अधिकारी उपस्थित होते.

सुभेदार मेजर सुभाष लगड यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, नाशिक देवळाली ११६ टीमचे जे सी ओ सुभेदार राजाराम वारंगसे, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी विद्यासागर कोरडे, श्रीगोंदा तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संदीप सांगळे, श्रीगोंदा तालुक्यातील श्री कोळाईदेवी आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ लगड,

रुईखेल, ढवळगाव, घारगाव, वाघोली, पारनेर, येळपणे येथील आजी-माजी सैनिक संघटना व त्यांचे पदाधिकारी, तसेच सुभेदार अर्जुन कुमार, अहमदनगर जिल्हा महिला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे, निलेश लंके प्रतिष्ठानचे दीपक लंके, कर्नल थोरात डी एम, कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड, सोसायटीचे चेअरमन हेमंत नलगे, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर भंडारी, देवळाली नाशिकचे कर्नल रावत, ऑनररी कॅप्टन थेऊरकर, सुभेदार मेजर अशोक कुमार, कर्नल जगताप, सुभेदार दीपक चव्हाण, गोडसे, राजाराम, मच्छिंद्र अनारसे, प्रकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिनू काका पंधरकर या सर्वांनी मेजर सुभेदार मेजर सुभाष लगड यांना अखेरची पुष्पांजली अर्पण केली. ११६ टी ए प्यारा कमांडो टीमच्या वतीने सुभेदार मेजर सुभाष लगड यांना सलग तीन वेळा बंदुकीतून फायर करून व लष्करी बँडच्या धून मध्ये अखेरची मानवंदना देण्यात आली.

सुभेदार मेजर सुभाष लगड यांनी २७ वर्ष देश सेवा केली. परंतु, आपल्या निधनानंतरही त्यांनी आपले किडनी दान करून कोणाचे तरी प्राण वाचविले व समाजाला आदर्श निर्माण करून दिला.

भारतीय तिरंगा मध्ये लपटलेला सुभेदार मेजर सुभाष लगड यांचा मृत्यूदेह पाहताच कुटुंबाने आक्रोश केला. अनेकांनी टाहो फोडला. एकीकडे भारतीय तिरंगामध्ये आलेले वीरमरण तर दुसरीकडे कुटुंबातील सदस्य निघून गेल्याचे दुःख, वडील श्रीरंग लगड, थोरले बंधू बाळासाहेब लगड, आई, पत्नी, व दोन मुले तसेच इतर नातेवाईकांना जाणवत होते. “भारत माता की जय” घोषणा होताच अनेकांचे डोळे पाणावले.

मानवंदना देताना लष्करी अधिकारी आणि ग्रामस्थ..

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading