१९९९ ची कारगिल लढाई . या लढाईत भारत मातेचा वीर जवान सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांनी घातक कंपनीतील सात कमांडो बरोबर घेऊन विज ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला . पाकिस्तानाने केलेल्या प्रतिहल्ल्यात भारताचे सहा जवान शहीद झाले . योगेंद्र सिंह यादव यांनीही सुरुवातीला तीन ते चार गोळ्या लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडले . एक हात निकामी झाला होता . अशा परिस्थितीत योगेंद्र सिंह यादव या बहादूर जवानाने आपल्या एके -४७ रायफलच्या साहाय्याने पाकिस्तानी सैन्याचा खात्मा केला . दिवसाचे विजय ऑपरेशन सक्सेस झाले . टायगर हिलवर भारताचा तिरंगा झेंडा पुन्हा दिमाखाने फडकला .
योगेंद्र सिंह यादव यांचा जन्म १० मे १ ९ ८० मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात अहिर गावात झाला . योगेंद्र सिंह यांचे वडील रामकरण सिंह माजी सैनिक , आई संतरादेवी उत्तम गृहिणी . थोरला भाऊ जितेंद्र सिंह भारतीय सैन्यात . त्यामुळे योगेंद्र सिंह यादव यांच्या नसा नसात वीरता आणि बेडरपणा भिनलेला फडकला .
अवघ्या सोळाव्या वर्षी ३ जुलै १ ९९ ६ रोजी सुभेदार योगेंद्र सिंह यादवा भारतीय सैन्यात भरती झाले . वीर जवानाचा रणभुमीवरचा खतरनाक प्रवेश सुरु झाला . कागिला युध्दाचे ढग डोक्यावर असताना योगेंद्र सिंह लग्नासाठी घरी आले . ५ मे १९९६ ला रिना यांच्याबरोबर संसाराची गाठ बांधली . लग्नानंतर आंनदोत्सव सुरु असताना युध्द भुमीवर येण्याचा संदेश आला . योगेंद्र सिंह यांनी आई – वडीलांच्या चरणाला स्पर्श केला . आशीर्वाद घेतले . पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि योगेंद्र सिंह युध्द भुमीकडे जिंकण्यासाठी रवाना झाले .
ब्रिगेडीयर सचिन निंबाळकर यांनी टायगर हिलवर तिरंगा फडकविण्यासाठी डेटा अल्फा आणि घातक अशा जवानांच्या तीन टीम केल्या . कर्नल कुशालचंद ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सात कमांडोच्या घातक टीममध्ये योगेंद्रसिंह जवानांचे अन्न पाणी घेऊन जाण्यासाठी पुढे होते . रात्रीचा प्रवास आणि दिवसभर हिमालयाच्या कपारीत बसणे . दोन रात्रीत सात जवानांची घातक टिम १६ हजार ५०० फुट उंचीच्या टायगर हिलजवळ पोहचली .
६० फुट उंचीचा कठडा दोराच्या साहाय्याने वर चढून घातक टीम वर पोहचली आणि पाकिस्तानी सैन्याने फायरिंग करून दोर तोडून टाकला . त्यामुळे बाकी सैनिकांचा वर चढण्यास मार्ग बंद झाला . अशा परिस्थितीत सात जवानांच्या टीमने दोन बंकर उडविले . यामुळे पाकिस्तानी सैनिक भयभित झाले . एकच पळापळ सुरु झाली . टायगर हिलवरुन पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यावर फायरिंग सुरु केली . भारतीय सैन्याचा दारुगोळा संपत आला होता . सचिन
मी दहावीपर्यंत शिकलो . भारतीय सैन्यदलात सोळाव्या वर्षी दाखल झालो . शाळेत कब्बडी , खो खो खेळांची विशेष आवड होती . शिक्षकांनी मेहनत घेतली . कारगिल युध्दात आई , वडील आणि शाळेत झालेले संस्कार कामी आले . या युध्दात देशाची कृपाआशीर्वादाने पुर्नजन्म झाला.त्यानंतर मी पदवी शिक्षण घेतले . भारतातील शाळा सक्षम झाल्या तर देश सक्षम होईल .
सुभेदार योगेंद्र सिंह , परमवीर चक्र विजेते
निंबाळकर यांच्या गनिमी काव्यानुसार भारतीय सैन्याने अचानक गोळीबार थांबवला . सर्व सैनिक ठार झाले असे समजून टायगर हिलवरून खाली उतरु लागले . याचवेळी दडी धरून बसलेल्या भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यावर घातक हल्ला चढविला . यामध्ये बहुंताशी सैनिक मारले गेले . पण या कामगिरीमध्ये भारताचे सहा जवान शहिद झाले . यादव यांना पाच सहा गोळ्या लागल्या . एक हात निकामी झाला . आणि मृत्यूशी झुंज सुरु होती . त्यानंतर पाकिस्तानी सैनिक पुन्हा टायगर हिलवर निघाले . योगेंद्र सिंह यांनी जखमी हात पट्टीने बांधला . भारत मातेला वंदन केले . जखमी अवस्थेतील चवताळलेल्या वाघाप्रमाणे ते पाकीस्तानी सैन्यावर तुटून पडले . एका हाताने सैन्यावर हातबॉम्ब फेकला . एके ४७ रायफल पाकिस्तानी सैन्यावर मोकळी केली . राहिलेल्या पाकीस्तानी सैन्याचा योगेंद्र यांनी खात्मा केला . यावेळी योगेंद्र सिंह जखमी झाले होते . विजय ऑपरेशन यशस्वी झाले .
टायगर हिलवर तिरंगा झेंडा पुन्हा मोठ्या अभिमानाने फडकला . ऑपरेशनचे योगेंद्र सिंह हे मुख्य शिलेदार बनले . या बहादुराला भारतमातेने सलाम केला . या भारतमातेच्या पुत्राला सर्वोच्च असलेल्या परमवीर चक्राने १५ ऑगस्ट १ ९९९ ला सन्मानित करण्यात आले . योगेंद्र सिंह यादव यांना सर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळाला . योगेंद्र सिंह यादव यांना अग्नीपंख फौडेशनने डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बहादूर जवान पुरस्काराने सन्मानित केले . अशा बहादर जवानाला अग्नीपंख फौंडेशनने सन २०१७ मध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम बहादुर जवान पुरस्काराने सन्मानित केल्याचा आनंद आहे .
शब्दांकन : बाळासाहेब बळे , ज्येष्ठ पत्रकार
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
