वाशिम येथील मातंग समाजावर हल्ला करुन, खून केलेल्या आरोपींना फाशी देण्याची दलित महासंघाची मागणी..

दिनांक ७ ऑगस्ट,अहमदनगर:

वाशिम येथील लहूजी चौकात १ ऑगस्ट रोजी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची शताब्दी जयंती साजरी करण्यासाठी जमलेल्या मातंग समाजातील महिला, पुरुष, मुले यांच्यावर गावातील जातीवादी समाज कंटकांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात गणेश गायकवाड या युवकावर हल्लेखोंरानी धारदार शस्त्राने वार करुन निर्घ्रुण खून केला. तसेच, या हल्ल्यात बरेच लोक जखमी झाले आहेत.

या भ्याड हल्ल्याचा दलित महासंघाच्या वतीने जाहिर निषेध करून आरोपीना फाशी देण्यात यावी, मयत कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावे, या कुटुंबाला तसेच मारहाण झालेल्या व्यक्तिनां सरकार कडून आर्थिक मदत देण्यात यावी, व सरकारी वकील मा. उज्वल निकम यांची नियुक्ति करावी. आदि मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी अहमदनगर यांना देण्यात आले.

नमूद मागण्या मान्य न झाल्यास दलित महासंघ आणि मातंग समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करील, असा इशारा (जिल्हाध्यक्ष) संजय चांदणे यांनी दिला आहे. यावेळी (प्रदेशाध्यक्ष) काशिनाथ सुलाखे पाटिल, (जिल्हाध्यक्ष) संजय चांदणे, (जिल्हा प्रसिद्धिप्रमुख) कडुबाबा लोंढे, (नगर तालुकाध्यक्ष) रफीक शेख, (शहराध्यक्ष) विशाल भालेराव, तसेच दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(दलित महासंघ,अहमदनगर)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading