संभाजी ब्रिगेड व वंचित शेतकऱ्यांचे हक्काच्या पाण्यासाठी कुकडी कार्यालयासमोरं आमरण उपोषण..

दिनांक ४ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

रोटेशन मध्ये तालुक्याला साडेसहा दिवस पाणी मिळणारे हे टेलचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर संभाजी ब्रिगेड व स्थानिक १३२ डी वाय बारा व १४ नंबर चारी येथील शेतकरी मोठ्या संख्येने कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग दोन श्रीगोंदा या कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसले होते.

टेलच्या शेतकऱ्यांना फळबागांना तातडीने पाणी देणे गरजेचे असताना अधिकाऱ्यांनी पाणी न दिल्यामुळे येथील शेतकरी आक्रमक होऊन उपोषणाचा पवित्र घेत आंदोलनावर ठाम होते. जिल्हा परिषद मा सदस्य अनिलजी ठवाळ हेही प्रामुख्याने उपस्थित होते. बी आर एस चे घनश्याम आण्णा शेलार यांनी उपोषण स्थळे भेट देऊन, शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारून पाणी कसे येईल त्यावर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना फोन कॉल करून येथील शेतकऱ्यांच्या समस्या प्रामुख्याने मांडण्यासाठी प्रयत्न केले.

तसेच, श्रीगोंदा येथील कुकडी कार्यालयातील कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे दोन श्रीगोंदा येथील कार्यालयाने उपोषण करताना आपल्या निवेदनातील मागण्याबाबत वरिष्ठ कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयास यांना अतिरिक्त पाणी मागणी मिळण्याबाबत अति तातडीने कळविण्यात आले. तसेच, आपले मागणीनुसार आणखी तीन दिवस पाणी मागणीबाबत वरिष्ठ स्तरावर कळविण्यात येत आहे. वरिष्ठ स्तरावरून सदर मागणी बाबत निर्णय झाल्यास आपली मागणी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन पत्र उपोषण करताना दिले.

या उपोषण करते वेळेस १३२ वरील शेतकरी साधारण २५० लोकं या ठिकाणी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडचे नाना शिंदे, गणेश पारे, सागर हिरडे तसेच प्रामुख्याने शहाजी भाऊ खेतमाळीस (नगरसेवक), (मा चेअरमन) बापूराव शिदनकर, (चेअरमन) गौतमची खेतमाळीस, (मा चेअरमन) भीमराव आनंदकर सर, (मा नगरसेवक) दादासाहेब औटी, (मा उपनगराध्यक्ष) नानासाहेब कोथिंबिरे, संतोष शिंदे (जिल्हा उपाध्यक्ष युवक शिवसेना, शिंदे गट), (शेतकरी नेते) गोरख आळेकर, (सामाजिक कार्यकर्ते) निलेशजी कुरुमकर, (संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष) अरविंद कापसे, (सरपंच) विलास रसाळ, (मा नगरसेवक) चमा खेतमाळीस, दादासाहेब हिरडे सह १३२ चारी वरील आजी-माजी चेअरमन, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading