श्रीगोंदा-अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात भाजपा सदस्यता अभियान आढावा बैठक संपन्न..

सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांना आमदार विक्रम पाचपुते यांचे मार्गदर्शन

दिनांक ५ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:

भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत राज्यभर भाजपा सदस्यता अभियान २०२५ जोरात राबवले जात आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्य कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत एक कोटी सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे. राज्यातील १.५ कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व मतदारसंघांमध्ये आढावा बैठकांचे आयोजन केले जात आहे.

श्रीगोंदा-अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातही याच पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

बैठकीत आमदार पाचपुते यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना किमान १ हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की, भविष्यात भाजपच्या सर्व निवडणुकांमध्ये, पक्षाच्या विविध पदांवर आणि शासकीय समित्यांवर काम करण्याची संधी हवी असल्यास प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर हे उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक आहे.

बैठकीदरम्यान डॉक्टर विक्रम भोसले यांचा एक हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल आमदार पाचपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार पाचपुते यांनी भाजपच्या संघटन पर्वात सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि पक्षाच्या वाढीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन करत या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

उपस्थित पदाधिकारी..

Leave a Reply