दिनांक २१ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:
अहिल्यानगर येथील पारनेर पंचायत समितीमध्ये ‘मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजने’च्या कामाचे देयक (बिल) मंजूर करण्यासाठी लाच घेताना तीन अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- लाचेची रक्कम: ₹६५,६००/-
- पकडलेले अधिकारी:
- पॅनल तांत्रिक अधिकारी विलास नवनाथ चौधरी (अटक)
- तांत्रिक सहायक दिनकर दत्तात्रय मगर (अटक)
- पसार झालेला अधिकारी: उपअभियंता अजय विठ्ठल जगदाळे यांची मूळ नियुक्ती श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये असून, त्यांच्याकडे पारनेरचा अतिरिक्त कार्यभार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (श्रीगोंद्यातील त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली आहे.)
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी पारनेर पंचायत समिती कार्यालयात सापळा रचून चौधरी आणि मगर यांना रंगेहात पकडले. उपअभियंता जगदाळे यांच्यासाठी मगर यांच्यामार्फत लाच स्वीकारण्यात येत होती. अटक केलेल्या दोघांना आज (शुक्रवारी) न्यायालयापुढे हजर करण्यात आले.
स्रोत:(ऑनलाइन वृत्त)
