दिनांक २२ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. शहर विकास आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित ही निवडणूक लढवण्यासाठी अनेक तरुण आणि नवखे उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
याच निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधून भाजपच्या वतीने उमेदवारी करणाऱ्या सौ. अश्विनी प्रवीण काळे या प्रभागातील विविध विकासकामांना प्राधान्य देत, या निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. भाजपची उमेदवारी मिळाल्याने त्या प्रचार व निवडणुकीच्या चर्चेत केंद्रस्थानी आहेत.

सौ. अश्विनी काळे यांच्या उमेदवारीमागे त्यांचे पती श्री. प्रवीण काळे यांचे भक्कम सामाजिक संघटन आणि तरुणांची मोठी फौज उभी आहे.
प्रवीण काळे यांनी या प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवले असून समाजाप्रती आपली कृतज्ञता वेळोवेळी व्यक्त केली आहे. त्यांनी शिवजयंती, भीम जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव तसेच अन्य समाजसुधारक आणि महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
शनी चौकातील दहीहंडी उत्सवातही ते अग्रणी राहिले आहेत. प्रभागातील सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात ते हिरीरीने सहभागी होत असल्याने त्यांची मोठी लोकप्रियता आहे.
प्रवीण काळे यांचे प्रभाग क्रमांक सात मधील सामाजिक योगदान आणि तरुणांचे मोठे संघटन लक्षात घेता, त्यांच्या पत्नी सौ. अश्विनी प्रवीण काळे यांना मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचार मोहिमेत मोठ्या संख्येने तरुण आणि स्थानिक मतदार सहभागी होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा कौल त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
माध्यमांशी बोलताना सौ. अश्विनी प्रवीण काळे यांनी स्पष्ट केले की, आगामी काळात श्रीगोंदा नगरपालिकेच्या माध्यमातून त्या विविध विकासकामे मार्गी लावतील. तसेच, सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न – जसे की वीज, पाणी, रस्ते आणि अन्य समस्या सोडवण्यासाठी त्या सदैव तत्पर राहतील. विकासकामांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
स्रोत:(अधिकृत माहिती)
