दिनांक १ ऑगस्ट २०२५,अहिल्यानगर:
श्रीगोंदा पोलीस स्टेशन व तोफखाना पोलीस स्टेशन येथे INFINITE BEACON FINANCIAL SERVICES व TRDEZ INVESTMENT PRIVATE LIMITED या दोन आर्थिक संस्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कंपन्यांनी नागरिकांना मोठा मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतली. मात्र, नंतर ना मूळ रक्कम परत करण्यात आली, ना व्याज देण्यात आले, परिणामी शेकडो नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस आणि तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये IPC 2023 कलम 316(2), 318(2), 318(4), 3(5) व महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फसवणूक झालेल्या सर्व गुंतवणूकदारांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी स्वतःकडील व्यवहाराचे पुरावे व कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथे तात्काळ संपर्क साधावा, जेणेकरून गुन्ह्याचा तपास अधिक प्रभावीपणे होऊ शकेल.

स्रोत:(आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर.)

Advertise…
