महसूल दिनाआधीच वाळू माफियांवर धडक: शिरुरच्या घोड धरणात दोन यांत्रिक बोटी जिलेटिनने उडवल्या..

दिनांक १ ऑगस्ट २०२५श्रीगोंदा/शिरुर:

महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला शिरुर तालुक्यात महसूल आणि पोलिस प्रशासनाने मिळून वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई करत घोड धरणातील दोन यांत्रिक बोटी आणि दोन फायबर स्फोटकांच्या साह्याने नष्ट केल्या. ही संयुक्त कारवाई शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईसाठी महसूल विभागाचे २५ जणांचे पथक तयार करण्यात आले होते. चिंचणी (ता. शिरुर) परिसरात बेसुमार वाळू उपसा करणाऱ्या बेकायदेशीर यंत्रसामुग्रीवर लक्ष्य ठेवण्यात आले. न्हावरे येथील मंडल अधिकारी नंदकुमार खरात यांनी अत्यंत गुप्ततेने योजना आखून घोड नदीपात्रात तीन ठिकाणी पथक उतरवले. स्वयंचलित बोटींच्या साहाय्याने पाठलाग करत वाळू माफियांच्या बोटी जप्त करण्यात आल्या.

कारवाईनंतर दोन यांत्रिक बोटी व दोन फायबर बोटी जिलेटिनच्या साह्याने उडवून देण्यात आल्या.

या मोहिमेत मंडल अधिकारी नंदकुमार खरात, प्रशांत कांबळे, राजू बडे, योगेश टिळेकर, आदित्य गायकवाड, अक्षय तांबट, हर्षद साबळे, रुपेश रोट्टी, श्रीकांत आढाव, भालचंद्र पंडित, संदीप ढमढेरे, आलिशा महाकाळ तसेच शिरुर पोलिस स्टेशनचे कर्मचारी सहभागी होते.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading