मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जिल्हा स्तरावर कार्यरत..

दिनांक २४ जानेवारी २०२५,मुंबई:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीची प्रक्रिया पेपरलेस केली जाईल.

गरजू रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातच मदत मिळावी यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली जात आहे. अर्ज प्रक्रियेसाठी मंत्रालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्जांचे पुनर्विलोकन, तज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून अर्थसाहाय्य रकमेचा आढावा, आणि मदतीसाठी प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जलद आणि सुलभ मदत मिळेल, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

स्रोत:(DIO)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading