देशी बनावटीच्या गावठी कट्यासह दोन आरोपी जेरबंद: श्रीगोंदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई.. #गोळीबाराचा Video पहा..

दिनांक २५ जानेवारी २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८:०० वाजता दोन अज्ञात इसमांनी स्विफ्ट कारमधून गावठी कट्ट्याचा वापर करून एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करण्यात आला.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथकांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळ व आसपासच्या भागाचा कसून शोध घेतल्यानंतर, काष्टी गावातील शिवराज लॉजिंगच्या सीसीटीव्ही फुटेजमधून वैभव सुभाष चौधरी आणि साई संजय मदने या दोन आरोपींची ओळख पटली.

दिनांक १८ जानेवारी रोजी पहाटे ६:३० वाजता पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. गोपनीय व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना जेरबंद करण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.

फिर्यादी सुभाष पाचपुते यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान कलम १०९, १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच आर्म्स अॅक्ट ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिस कोठडीत सखोल चौकशी सुरू असून आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. परंतु पोलिसांच्या दबावाखाली त्यांनी गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा कबूल केला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, सचिन लिमकर, पोकॉ गोकुळ इंगवले, संदीप शिरसाठ, संदीप राऊत, अरूण पवार, राहूल गुंडू (Cyber), अविनाश कराळे आणि त्यांच्या पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

अटक आरोपी..
Video:काष्टी येथील गोळीबार

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading