प्रजासत्ताक दिनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांविरोधात आंदोलन.. महिलांचा सवाल: “चोरांना सोडले, अत्याचार करणाऱ्यांनाही सोडणार का?”

दिनांक २७ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तहसीलदार क्षितिजा वाघमारे व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या विरोधात युवराज विठ्ठल पळसकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महिलांचा आरोप आहे की, चोरीसाठी अटक झालेल्या चोरांना सोडून देणाऱ्या पोलीस निरीक्षकांनी अन्याय झाल्यासही अशीच भूमिका घेणार का?महिलांनी शेळी चोरीच्या प्रकरणात तक्रार न घेतल्याबद्दल संताप व्यक्त केला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी प्रशासनातील निष्काळजीपणाचा निषेध करत श्रीगोंद्याला कर्तव्यदक्ष अधिकारी मिळावेत, अशी मागणी केली.

महिलांनी शेळी चोरीच्या प्रकरणात तक्रार न घेतल्याबद्दल संताप व्यक्त केला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी प्रशासनातील निष्काळजीपणाचा निषेध करत श्रीगोंद्याला कर्तव्यदक्ष अधिकारी मिळावेत, अशी मागणी केली.

या आंदोलनात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रशासनाने पुढील कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

स्रोत:(आंदोलन)

जाहिरात..

Leave a Reply