सिद्धार्थ नगरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा: महिलांचा व मुलांचा भरघोस सहभाग..

दिनांक २७ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:

शहरातील सिद्धार्थ नगर येथे सावित्री महिला मंच आणि वर्षा सचिन घोडके यांच्या पुढाकाराने प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जनजागृती व प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष ॲड. संभाजीराव बोरुडे (आप्पा), ॲड. प्रदीप खामगळ, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सोनटक्के, पत्रकार चंदन घोडके, संविधान प्रचारक रावसाहेब घोडके, मनीषा घोडके, मीनाताई नवले आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक रेश्मा घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात महिलांचा आणि मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी वर्षा घोडके, मेनका लोंढे, जयश्री घोडके, कविता घोडके, अदीकाबाई घोडके, प्राजक्ता जाधव, गीताबाई घोडके, सुषमा घोडके आदी महिलांची तसेच, सचिन घोडके, लखन घोडके, तनिष घोडके, प्रणव घोडके, दीपक घोडके, युवराज घोडके, अनिल घोडके, भीमराव कोथिंबीरे, आदित्य लोंढे, प्रतीक लोंढे, शिवाजी ताडे, नंदन ताडे आदी पुरुष मंडळींची उपस्थिती होती.

सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सोनटक्के यांनी महापुरुषांच्या जीवनचरित्राचा उल्लेख करत संविधानाच्या महत्त्वावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, संविधानामुळेच सर्वसामान्य माणसांना त्यांचे हक्क आणि अधिकार प्राप्त झाले आहेत.

ॲड. प्रदीप खांबगळ यांनी समतावादी विचारांवर भर देत सर्व महापुरुषांच्या योगदानाचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला.

सामाजिक कार्यकर्त्या मनीषा घोडके यांनीही महिलांसाठी प्रेरणादायी विचार व्यक्त केले.

ॲड. संभाजी आप्पा बोरुडे यांनीही आपले विचार मांडले जागृतीचा अग्नी तेवत ठेवा.. हा बाबासाहेबांचा विचार सर्वांनी आत्मसात करत आपली सामाजिक चळवळ पुढे गतिमान करावी असे त्यांनी सांगितले. फुले, शाहू, आंबेडकरांचे मौलिक विचार श्रीगोंदा तालुका सह पंचक्रोशीत ॲड. बोरुडे पोहोचवत असल्याचे अनेकांनी आपल्या भाषणातून नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राध्यापक रेश्मा घोडके यांनी रमाई, सावित्री, अहिल्या, आणि जिजाऊ यांच्या जीवनपटाचा उल्लेख करून उपस्थित महिलांना प्रेरणा दिली. तसेच, लहान मुलांनी केलेल्या भाषणांचा गौरव करत त्यांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद सोनटक्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्रकार चंदन घोडके यांनी मानले. यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सिद्धार्थ नगरातील नागरिकांनी संयोजकांचे आभार मानले.

स्रोत: (आयोजीत कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading