दिनांक १ जुलै २०२४,श्रीगोंदा:
जीवन विद्या मिशनचे दिवंगत अध्यक्ष सदगुरू वामनराव पै यांचे गुरु नारायण महाराज यांच्या समाधीचे दर्शन पै यांचे सदशिष्य तसेच शिक्षण संचालनालय, पुणेचे सेवानिवृत्त अधिक्षक महादेवराव जामले यांनी घेतले. “तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या ध्येयाने प्रेरित होऊन लाखो चाहत्यांना जीवनविद्या देणारे सदगुरू वामनराव पै यांनी श्रीगोंदा येथील नारायण महाराज यांना आपले गुरु मानले होते. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांनी महाराष्ट्रभर जीवन विद्येचा प्रसार केला. पै यांच्यानंतर हाच वारसा त्यांचे सदशिष्य महादेवराव जामले जपत आहेत.
महादेवराव जामले अनेक व्याख्यानातून चांगले प्रयत्न करणाऱ्यांना चांगले फळ मिळते, “जे पेराल तेच उगवते” असे सांगून समाजप्रबोधन करीत आहेत. त्यांनी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या श्रीगोंदा शाखेस भेट देऊन बँकेच्या विविध योजनांचे तसेच उत्कृष्ट कारभाराबद्दल बँकेचे कौतुकही केले.
या प्रसंगी बँकेचे मा. चेअरमन डॉ. संदीप मोटे पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रामदास ठाकर, बारामती मार्केट कमिटी तसेच खरेदी विक्री संघाचे मा. अध्यक्ष अंकुशराव रसाळ, कारखेलचे मा. सरपंच ज्ञानदेवराव खराडे, सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव जामले, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संदिप होले, मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर पुरस्कार प्राप्त शाळेचे मुख्याध्यापक बापूराव खामकर, राजेंद्र राऊत, पत्रकार पीटर रणसिंग, शाखाधिकारी किशोर शिंदे, दीपक डोळे, रविंद्र वाव्हळ आदी उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)




